विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा केला जात होता. शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि राजेश टोपे यांनीही याबाबत कायदेशीर पातळीवर चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. अजित पवार यांच्या इच्छेनुसार दोन्ही गट एकत्र यावेत, अशी भावना दोन्हीकडून व्यक्त होत होती.Sharad Pawar
मात्र, विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची सूत्रे थेट सुनेत्रा पवार यांच्या हाती देण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा मुद्दा पुन्हा अधांतरी गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.Sharad Pawar
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षप्रमुख शरद पवार यांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, हे शनिवारी स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप शरद पवार गटाकडून केला जात आहे.Sharad Pawar
या घडामोडींमुळे पवार कुटुंबातील राजकीय दरी पुन्हा एकदा उघड झाल्याचे मानले जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत.
विलीनीकरणाबाबत माध्यमांनी प्रश्न विचारले असता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मात्र, समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवर त्यांनी खुलासा केला. हा व्हिडिओ बारामतीतील कृषी प्रदर्शनातील चहापान बैठकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्या बैठकीत केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली होती, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत, याची माहिती शरद पवार तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देण्यात आलेली नव्हती.
शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत त्यांना कोणतीही माहिती नव्हती. अजित पवार यांची इच्छा दोन्ही गटांचे विलीनीकरण करण्याची होती आणि त्या दिशेने सकारात्मक चर्चा सुरू होती. मात्र, अचानक घडलेल्या घटनांमुळे ती प्रक्रिया थांबली, असे त्यांनी सांगितले.
इतका महत्त्वाचा निर्णय घाईघाईने का घेण्यात आला, असा सवाल उपस्थित करत या निर्णयामागे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची भूमिका असावी, अशी शंका शरद पवार यांनी व्यक्त केली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र येत ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण जवळपास निश्चित मानले जात होते.
मात्र, अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळाली असून, सध्या तरी दोन्ही गटांचे एकत्रीकरण अनिश्चित अवस्थेत गेले आहे.
NCP Merger Back In Limbo As Sunetra Pawar’s Swearing-In Alters Political Equations
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होते:सुषमा अंधारेंचा सुनेत्रा पवारांना पत्र लिहून सावध राहण्याचा सल्ला
- Sunetra Pawar राज्याला सुनेत्रा पवार यांच्या रूपात मिळाल्या पहिल्या उपमुख्यमंत्री
- निवडणूक पथकाकडून मावळमध्ये साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
- कार्यकर्ते सैरावैरा होऊ नयेत म्हणून निर्णय, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका