Amol Mitkari : दोन्ही गट एकत्र आल्यास पक्ष अधिक मजबूत, अमोल मिटकरी यांचे मत

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Amol Mitkari  आदरणीय साहेब आणि आम्ही एकत्र असलो पाहिजे. पक्ष एकत्र असला की दुसरे लोक घुसखोरी करणार नाहीत. पक्षातील एकजूट टिकवणे हेच सध्याच्या परिस्थितीत सर्वांत महत्त्वाचे आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास पक्ष अधिक मजबूत राहील, असे त्यांचे मत होते.Amol Mitkari

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, अजित पवार यांची उणीव कोणत्याही परिस्थितीत भरून निघू शकत नाही. आमच्यासारखे अनेकजण आज दादांना खूप मिस करत होते. सुनेत्रा पवार यांनी अत्यंत जड अंतःकरणाने उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. सुनेत्रा वहिनींनी हे शिवधनुष्य उचलले आहे,Amol Mitkari

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी एवढी घाई का करण्यात आली, यावर मिटकरी म्हणाले की, हा निर्णय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला आहे. हा निर्णय पार्लमेंटरी बोर्डामध्ये झाला आहे. आम्हाला तो निर्णय पाळावाच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. लोक टीका-टिप्पणी करतात, पण अशा वेळी पक्ष अधिक महत्त्वाचा असतो, असेही ते म्हणाले. दुःखाच्या या वातावरणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी सावरणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.Amol Mitkari



राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चांवर बोलताना मिटकरी यांनी आपली वैयक्तिक भूमिका मांडली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, ही माझी शंभर टक्के इच्छा आहे, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. मात्र, याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे सांगत त्यांनी संयमही दाखवला. मी इतका मोठा नाही की या विषयावर अंतिम मत देऊ, असे म्हणत त्यांनी नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. आदरणीय साहेब आणि आम्ही एकत्र असलो पाहिजे. पक्ष एकत्र असला की दुसरे लोक घुसखोरी करणार नाहीत, असे ते म्हणाले. त्यांच्या मते, पक्षातील एकजूट टिकवणे हेच सध्याच्या परिस्थितीत सर्वांत महत्त्वाचे आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास पक्ष अधिक मजबूत राहील, असे त्यांचे मत होते. मिटकरी यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या आठवणी जाग्या केल्या. आज अजितदादा नाहीत, त्यामुळे काही बोलण्याची इच्छाही होत नाही, असे ते म्हणाले. शपथविधीच्या वेळी दिल्या गेलेल्या घोषणांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांच्या भावना अजूनही ताज्या आहेत. अशा वेळी राजकारणापेक्षा भावना आणि पक्षसंघटना सावरणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

Party Will Be Stronger If Both Factions Unite: Amol Mitkari

महत्वाच्या बातम्या