CM : अजित पवार विमान अपघातातील 13 निर्धारित मुद्यांवर चौकशी सुरू, मुख्यमंत्र्यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CM दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता. विमान अपघातावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. 13 निर्धारित मुद्यांवर सध्या चौकशी सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.CM

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून (23 फेब्रुवारी) सुरुवात होत असून, त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. फडणवीस म्हणाले, डिजिटल रेकॉर्ड घेतला आहे. डेटा उपलब्ध होणार नाही, अशी काही बाब नाही. व्हाईस रेकॉर्ड झालेला डेटा रिकव्हर केले जात आहेत. व्हीएसआर कंपनीचे ऑडिट केले जात आहे. केवळ अपघात वेळीच नाही सर्वच वर्षाच ऑडिट केले जाणार आहे. लॉगबुक पासून सगळ्या बाजू तपासल्या जातील. ज्या काही शंका आहे त्या सोडवल्या जातील.
केंद्र सरकार आणि हवाई उड्डाण खात्याला लपवण्यासारखं काहीच नाही. या चौकशीतून जे काही समोर येईल ते आम्हाला देखील महत्वाचं आहे. तसेच अजित पवारांचा अपघात झाला त्या विमानातून मी स्वतः 4-5 वेळा प्रवास केला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.CM



देवेंद्र फडणवीस म्हणाले, व्हीएसआर ही कंपनी स्वतः विमाने बनवत नाही, तर ती एक ‘एजंट’ किंवा ‘ऑपरेटर’ आहे. अनेक खाजगी व्यक्ती आपली विमाने अशा ऑपरेटरकडे देखभालीसाठी आणि कमर्शियल वापरासाठी (परमिटवर) देतात. याच संदर्भात बोलताना त्यांनी नमूद केले की, ज्या विमानातून दादांचा प्रवास झाला, त्या विशिष्ट कंपनीच्या किंवा ऑपरेटरच्या विमानातून मी स्वतःदेखील 4 ते 5 वेळा प्रवास केला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे मोजकेच (5 ते 7) ऑपरेटर्स आहेत. जेव्हा सरकारला विमानाची गरज असते, तेव्हा रोटेशन पद्धतीने किंवा उपलब्धतेनुसार यापैकीच एका ऑपरेटरचे विमान येते. गेल्या काही काळात व्हीएसआर हा मोठा ऑपरेटर ठरल्याने त्यांची विमाने वारंवार वापरली जातात.

Probe Underway Into 13 Key Points in Ajit Pawar Plane Crash: CM

महत्वाच्या बातम्या