Rohit Pawar : रोहित पवारांना हवं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कब्जा, मंत्री अनिल पाटील यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Rohit Pawar रोहित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कब्जा हवा आहे, त्यासाठी ते आमच्या नेत्यांवर खापर फोडत आहेत, असा आरोप मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी केला आहे.Rohit Pawar

रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे. यासाठी ते आक्रमक झाले आहेत. यावर अनिल पाटील म्हणाले, अजित दादांवर जर तुमचे खरेच प्रेम असेल तर नाटक करायची काही गरज नाही. रोहित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. रोहित पवार काही एजन्सी नाहीत, त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणांकडे द्यावेत. जर त्यांना सुनेत्रा पवार यांच्याबद्दल एवढेच वाटत आहे तर जेव्हा त्या राष्ट्रीय अध्यक्ष होत आहेत, तेव्हा त्यांना सोडून जायला नको होते.Rohit Pawar



पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार पत्रकारांना थोड्या दिवसात बोलतील. अमोल मिटकरी असेल किंवा आम्ही सगळे आमदार असू, आमचे एकच म्हणणे आहे की सगळ्या घटनेचा तपास झाला पाहिजे, सत्य बाहेर आले पाहिजे आणि यंत्रणा ते काम करतील, असेही अनिल पाटील म्हणाले.

आमदार सुनील शेळके म्हणाले, रोहित पवार हे दररोज नव-नवीन पुरावे समोर आणत आहेत, मग ते वरिष्ठ नेते पवार साहेब, सुनेत्राताई पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसून त्यांच्यासमोर का मांडत नाहीत? दादांच्या बाबतीत कोणीही राजकारण करत नाही. मुळात आमच्या पक्षात काय चालले आहे याकडे पाहण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चालले आहे हे पहावे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी सुनेत्राताईंची निवड करून योग्य तो मानसन्मान आम्ही ठेवलेला आहे. झिरवाळांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिले आहे. रोहित पवार जे आरोप करत आहेत, त्यात तथ्य नाही

Rohit Pawar Wants to Take Over NCP, Alleges Minister Anil Patil

महत्वाच्या बातम्या