विशेष प्रतिनिधी
मुंबई : Trishna Vishwasrao मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समित्यांपैकी एक असलेल्या बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या (शिंदे) तृष्णा विश्वासराव यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बेस्ट समितीच्या निवडणुकीत शिवसेनेकडून(शिंदे) अध्यक्षपदासाठी तृष्णा विश्वासराव यांचा एकमेव अर्ज आला होता. या निवडणुकीत त्यांच्या विरोधात कोणत्याही इतर पक्षाने उमेदवार न दिल्याने पालिका नियमानुसार बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी तृष्णा विश्वासराव यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले.Trishna Vishwasrao
बेस्ट समितीच्या आतापर्यंतच्या इतिहासात कोणीही महिला अध्यक्षा झालेल्या नव्हत्या. अगदी मुंबई महापालिकेत आणि बेस्टमध्ये देखील गेली सलग 25 वर्षे सत्ता असूनही शिवसेनेने (अखंड) कधीही बेस्ट समितीवर महिला नगरसेवकांना संधी देण्यात आलेली नव्हती. मात्र चार वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. शिवसेना (शिंदे) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे दोन गट झाले. तृष्णा विश्वासराव यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची नगरसेवक पदाची कामगिरी लक्षात घेत प्रथमच बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी तृष्णा विश्वासराव यांच्या रूपाने एक महिला नगरसेविका म्हणून त्यांच्याकडे बेस्ट समिती अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. विशेष म्हणजे तृष्णा विश्वासराव यांच्या विरोधात विरोधी पक्षाने एकही उमेदवार दिला नाही. त्यामुळे तृष्णा विश्वासराव या आज पार पडलेल्या निवडणुकीत बिनविरोध बेस्ट समिती अध्यक्ष झाल्याचे महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले. भाजपचे गटनेते व पालिका सभागृहनेते गणेश खणकर, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यावेळी उपस्थित होते.Trishna Vishwasrao
मुंबई शहर भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर म्हणून ओळखले जाते. आज शहरात पार्किंगकरिता मोठ्या प्रमाणावर जागा व्यापली जात आहे. स्वतंत्र पार्किंग ही काळाची गरज आहे. तसेच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. बेस्ट, मेट्रो, मोनो, रेल्वे लोकल अशा सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय एकमेकांशी जोडणे महत्त्वाचे ठरणार आहेत, म्हणून त्यादृष्टीने योग्य त्या ठोस उपाययोजना बेस्ट उपक्रमाच्या समितीमार्फत केल्या जातील, असे निर्देश बेस्ट समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. तसेच बेस्ट समितीवर पहिल्या अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्यावर तृष्णा विश्वासराव यांनी आपल्या पहिल्याच अध्यक्षीय भाषणात वरीलप्रमाणे निर्देश दिले. बेस्ट उपक्रमाच्या बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करून प्रवासी जनता व वीजग्राहक यांच्या समस्यांचे निवारण करण्याची तसेच प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या दरम्यान समन्वय साधण्याची जबाबदारी पक्षाने आपल्यावर सोपविली असल्याचे तृष्णा विश्वासराव यांनी सांगितले. तसेच, त्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला आपण कधीही तडा जाऊ देणार नाही. त्यादृष्ट्रीने, बेस्ट उपक्रमातर्फे उपलब्ध करण्यात येणा-या विद्युत पुरवठा व परिवहन या दोन सेवा अधिकाधिक कार्यक्षम व लोकाभिमुख करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.
Shiv Sena (Shinde) Leader Trishna Vishwasrao Elected Unopposed as Best Committee Chairperson
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करणार, राजू शेट्टी यांचा इशारा
- Rahul Gandhi राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी; भाजपने ठाण्यात दाखवले काळे झेंडे
- Bhiwgan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधार गृहात रवानगी
- Muslim Reservation : मुस्लिम समाजाच्या आरक्षण रद्द विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका