Chief Minister : गेल्या दहा वर्षांमध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेत तिप्पट वाढ, मुख्यमंत्र्यांचा पाच ट्रिलियनचा टप्पा गाठण्याचा विश्वास

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Chief Minister गेल्या दहा वर्षांमध्ये राज्याची अर्थव्यवस्था तीन पटीने वाढली असून हाच वेग कायम ठेवून आपण पाच ट्रिलियनचा टप्पा गाठू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.Chief Minister

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले, राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान २०४७ पर्यंत पाच लाख कोटी अर्थात ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यायची असून त्यातून दरवर्षी १० लाख रोजगार तयार करायचे आहेत, असे नमूद करून फडणवीस म्हणाले की, वित्तीय शिस्त पाळून वित्तीय तूट अडीच टक्क्यांखाली आणायची आहे. यासाठी राज्यात शंभर उपक्रम घेतले असून त्याचे व्हिजन मॅनेजमेंट तयार केले आहे. मॅकेन्जीसारख्या कंपनीचा सल्ला त्यासाठी घेत आहोत. हे पुस्तक तयार करण्याइतके सोपे नाही. बजेट ट्रिलियन डॉलर नाही करायचे, अर्थव्यवस्था तयार करायची आहे. आज अर्थव्यवस्था ५१ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे, आणखी ४० लाख कोटींपर्यंत विस्तारीत करायची आहे. सन २०१२-१३ मध्ये अर्थव्यवस्था तेरा लाख कोटी होती. आता ती तिप्पट झाली आहे. जगात काही देशांची अर्थव्यवस्था देखील ट्रिलियन डॉलर नाही.Chief Minister



कुंभमेळ्याबाबतच्या आक्षेपांना उत्तर देताना ते म्हणाले की, कुंभमेळा हा दर साडेबारा वर्षांनी येणारा आहे. जगात इतक्या मोठ्या प्रमाणात कुठेही मेळावा होत नाही. ज्या व्यवस्था आपण करतोय, त्या कुंभ मेळ्यापुरत्या मर्यादित नाहीत. पर्यावरणसाठी उपाययोजना करतोय. रस्ते रुंदीकरण, एअरपोर्ट, रिंग रोड करतोय. त्यामुळे धार्मिक व इतर पर्यटन वाढेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

भास्कर जाधव यांनी युवा प्रशिक्षण अभियानाबाबत काही आक्षेप नोंदवले होते. त्याबाबत खुलासा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अभियान हे ११ महिन्यांसाठी असणार ते आधीच घोषित केले होते, इतरत्र नोकरीला जाताना उमेदवारांना फायदा व्हावा यासाठी त्यांना अनुभवपत्र देण्यात आले होते. प्रशिक्षणार्थी युवकांना पर्मनंट करणार हे सांगितल्याचे भास्कर जाधव म्हणाले. तसे रेकॉर्ड असेल तर पाठवून द्या, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले. चांगल्याला चांगलं म्हणायला शिका.

State Economy Triples in Ten Years; Chief Minister Confident of Reaching $5 Trillion Milestone

महत्वाच्या बातम्या