Sunetra Pawar बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढविणार, बिनविरोध करण्याचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत. पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.Sunetra Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही जागा रिक्त झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंदविलेल्या मतदारांना पोटनिवडणुकीत मतदानाचा अधिकार असेल. 10 मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Sunetra Pawar



सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर एकमत झाले. पक्षाने ही निवडणूक शक्यतो बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली आहे प्रारूप मतदारयादी 10 मार्चला जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना अधिक वेग येईल.Sunetra Pawar

सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता सुनेत्रा पवार यांची निवड बिनविरोध होण्याचीच शक्यता आहे. गेल्या वेळी अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढले होते. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून किंवा महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष लढणार नाही.Sunetra Pawar

Sunetra Pawar to Contest Baramati By-Election; Efforts Underway to Ensure Unopposed Victory

महत्वाच्या बातम्या