contractor’s agitation तब्बल ७७ हजार कोटी रुपयांची देयके अद्याप प्रलंबित, कंत्राटदार आंदोलनाच्या पावित्र्यात

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : शासकीय कंत्राटदारांची तब्बल ७७ हजार कोटी रुपयांची देयके अद्याप प्रलंबित असून, शासनाने दिलेले चेकही ट्रेझरीमध्ये पैसे नसल्यामुळे वटत नसल्याचा आरोप ‘राज्य कंत्राटदार महासंघाने’ केला आहे. contractor’s agitation.

मागील वर्षापर्यंत कंत्राटदारांची एकूण थकबाकी ८९ हजार कोटी रुपयांच्या घरात होती. कामाचे पैसे मिळत नसल्याने कंत्राटदारांनी आत्महत्या देखील केली होती. यानंतर कंत्राटदार आणि अभियंत्यांनी वारंवार केलेल्या आंदोलनांनंतर सरकारने काही रक्कम देण्याचे मान्य केले होते. मात्र, प्रत्यक्षात वर्षभरात केवळ १० टक्के रक्कमच अदा करण्यात आली आहे. उर्वरित ७७ हजार कोटींसाठी कंत्राटदार आजही सरकारी कार्यालयांत हेलपाटे मारत आहेत.contractor’s agitation.



राज्य कंत्राटदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले म्हणाले, “काही विभागांनी कंत्राटदारांना थकबाकीचे चेक दिले आहेत, पण जेव्हा हे चेक बँकेत किंवा ट्रेझरीकडे नेले जातात, तेव्हा तिथे पैसे नसल्याचे सांगण्यात येते. हा कंत्राटदारांची थट्टा करण्याचाच प्रकार आहे.contractor’s agitation.

निधी अभावी केवळ जुनी देयकेच रखडलेली नाहीत, तर सध्या सुरू असलेली विकासकामेही जागीच थांबली आहेत. नवीन कामांना मंजुरी देण्याचे प्रमाणही नगण्य आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी ९ मार्च रोजी राज्यातील शासकीय अभियंता आणि कंत्राटदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती मिलिंद भोसले यांनी दिली.contractor’s agitation.

Payments worth Rs 77,000 crore are still pending, amid the sanctity of the contractor’s agitation.

महत्वाच्या बातम्या