विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sunetra Pawar अजितदादांनी आर्थिक तडजोड कधीही केली नाही. विकास आणि शिस्त याचा समतोल राखत त्यांनी काम केले. फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाच्याखाली आणि एकनाथ शिंदे यांच्या साथीने दादांनी अर्थसंकल्पाची जोरदार तयारी केली होती. यावर्षीचा हा त्यांचा 12 वा अर्थसंकल्प ठरला असता, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि आपल्याला ते सोडून गेले, अशा भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या.Sunetra Pawar
सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.Sunetra Pawar
पत्रकार परिषदेत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, उद्यापासून महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात विविध विषयांवर चर्चा व्हावी हे अपेक्षित असते. आता हे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की अजितदादा यांनी राज्याचा 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. 2011 साली पहिल्यांदा सादर केलेला अर्थसंकल्प हा 1 लाख 44 हजार 783 कोटी रुपयांचा होता. तर 2025 मध्ये त्यांच्या कारकीर्दीतील शेवटचे अर्थसंकल्प हे सर्वाधिक 7 लाख 20 हजार कोटी रुपयांचे होते. ही केवळ आकड्यांमध्ये झालेली वाढ नाही तर राज्याच्या सर्वांगीण विकासात झालेली वाढ आहे.
Sunetra Pawar Turns Emotional Amid Budget Preparations
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करणार, राजू शेट्टी यांचा इशारा
- Rahul Gandhi राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी; भाजपने ठाण्यात दाखवले काळे झेंडे
- Bhiwgan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधार गृहात रवानगी
- Muslim Reservation : मुस्लिम समाजाच्या आरक्षण रद्द विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका