Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत प्रस्ताव नाही अन् विचारही नाही, सुनील तटकरे यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sunil Tatkare राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही आणि आमच्या विचारार्थही नाही. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएमध्येच राहणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.Sunil Tatkare

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही गटांच्या विलिनिकरणाची चर्चा सुरू झाली आहे. यावर तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही आणि आमच्या विचारार्थही नाही. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएमध्येच राहणार आहोत या भूमिकेशी ज्यांना समरस व्हायचे असेल किंवा या भूमिकेबरोबर वाटचाल करायची असेल त्यांचे जरूर पक्षात स्वागत आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा मुद्दाच नाही. आमच्याकडे प्रस्तावच नाही किंवा कशातच नाही आज त्या गोष्टीची चर्चा आमच्या स्तरावर अस्तित्वात नाही. त्याबद्दल भाष्य करण्यात काय अर्थ आहे,

ज्या क्षणापर्यंत विलिनीकरणाच्या प्रस्तावाचा साधा विचारही समोर आला नाही. त्याची चर्चाही नाही. त्यामुळे विरोध असणे… अनुकूल असणे… प्रतिकूल असणे… हा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे प्रस्ताव नाही त्यावर आज विलिनीकरणाचा प्रश्नच नाही. आज आम्ही आमच्या मूळ विचारधारेसोबतच एनडीएमध्ये सहभागी आहोत आणि एनडीएमध्ये सहभागी असल्यामुळे आज आमचा पुढचा राजकीय प्रवास त्यांच्यासोबत देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. त्यामुळे त्यात बदल होण्याचे कारण नाही असेही सुनील तटकरे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

तटकरे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकी नंतर आम्ही राहतो की नाही असा प्रश्न निर्माण केला जात होता. आता त्या सर्व प्रश्नांची उत्तरे राजकीयदृष्ट्या राज्यातील जनतेने दिली आहेत. त्यामुळे जर – तरच्या मुद्द्यावर मी प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे कुठलेही वक्तव्य करणे चुकीचे ठरेल. एकदा नक्की कळूदे की, प्रश्न विलिनीकरणाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर चर्चेला आला मग पुढच्या बाबी येतील. परंतु जे नाहीच आणि दिसत नाही त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे. त्यामुळे आता सूत्रांच्या बातम्या किंवा ती सुत्रे आम्हाला शोधावी लागतील.

Sunil Tatkare clarified that there is no proposal and no consideration regarding the merger of the two factions of NCP

महत्वाच्या बातम्या