माहिती अधिकार वाचविण्यासाठी प्राणांची आहुती, अण्णा हजारे यांचा सरकारला इशारा
विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर : माहिती अधिकार कायद्यातील प्रस्तावित बदलांच्या विराेधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कडक भूमिका घेतली आहे. माहितीचा अधिकार वाचवण्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती देण्यासही मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.













