BJP worker murdered : भाजप कार्यकर्त्याची हत्या, एन्काऊंटर ला घाबरून आरोपी कोर्टात झाला हजर

विशेष प्रतिनिधी

पिंपरी: BJP worker murdered भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी याच्या खुनातील मुख्य आरोपी आफताब समीर शेख हा पिंपरी चिंचवड पोलिसांकडून होणाऱ्या संभाव्य एन्काऊंटर ला घाबरून आरोपी कोर्टात झाला असून, त्याने तसे लेखी पत्र वडगाव मावळ कोर्टात सादर केले आहे.BJP worker murdered

खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या आई आणि भावाच्या जामिनाला विरोध करत असल्याने रमेश गुरूस्वामी रेड्डी याचा आठ दिवसांपूर्वी देहूरोड येथे गोळीबार करीत खून करण्यात आला होता. याप्रकरणी आफताब आणि अन्यारोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेतला जात होता. दरम्यान, यातील एका आरोपीला सांगवी तर अन्य चार आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेतील गुंडा विरोधी पथक तसेच अन्य पथकांनी अटक केली आहे.BJP worker murdered



मात्र, यातील मुख्य आरोपी आफताब हा फरार होता. त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने पोलिसांकडून शोध घेतला जात होता. २१ हून अधिक गोळ्या झाडून रमेश रेड्डी याचा निर्घृण खून करण्यात आला होता. आफताब याच्या काही नातेवाईक आणि त्याच्या संपर्कात असणाऱ्याकडे पोलिसांची चौकशी सुरू होती.

तेव्हा चौकशी करणाऱ्या पोलिसांनी, मला दिसताच क्षणी मारण्याचे आदेश आहेत, असे सांगितलं असल्याचे आफताब याने वडगाव मावळ कोर्टात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

पोलिसांकडून न्याय प्रक्रियेच्या विरुद्ध असलेल्या पद्धतीने म्हणजेच फेक एन्काऊंटर करण्याची शक्यता असल्याची भीती त्याने निवेदनातून व्यक्त केली आहे. त्यामुळेच माझ्या जीवाला धोका आहे. मी न्यायालयात आत्मसमर्पण करण्यास तयार आहे आणि त्यानंतर माझी रवानगी न्यायालयीन कोठडीत व्हावी अशी विनंती वडगाव कोर्टाला केली.

तसेच मी याआधी पुणे कोर्टात अर्ज दाखल केला होता पण तो स्थानिक अधिकारी क्षेत्राच्या बाहेर येत असल्याने न्यायालयाने नामंजूर केला आहे. सदर न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात हा गुन्हा घडला असल्याने, मला वरील गुन्ह्यात हजर करून घेऊन या न्यायालयाला हा अर्ज चालविण्यात यावे असे त्याने नमूद केले आहे.

रमेश रेड्डीचा भाऊ विक्रम याच्या खुनात आरोपीचा भाऊ साबीर आणि आई रझिया तुरुंगात असून त्यांच्या जामिनाला रमेश रेड्डी विरोध करत होता. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वीच आरोपींनी रमेश रेड्डी याच्या घरासमोर उभे राहून आमच्या आई आणि भावाला जामीन झाला नाही तर सर्वांना जीवे मारू, अशी धमकी दिली होती. त्यानंतर मंगळवारी (२८ एप्रिल) रात्री नऊ वाजताच्या सुमारास पाळत ठेऊन आरोपींनी रेड्डी याच्यावर गोळीबार करत खून केला होता.

BJP worker murdered; accused surrenders in court fearing encounter

महत्वाच्या बातम्या