Deputy CM Eknath Shinde : नराधमाला जीवंत राहण्याचा अधिकार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंचा पीडितेच्या वडिलांना फोन

विशेष प्रतिनिधी

पुणे : Deputy CM Eknath Shinde पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात महाराष्ट्र दिनी घडलेल्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. नसरापूरमधील चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून नराधम आरोपीने तिची क्रूर हत्या केली. या घटनेच्या विरोधात राज्यभरातून मोठ्या संख्येने संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला तत्काळ शिक्षा करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.Deputy CM Eknath Shinde



तसेच राज्य सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची ग्वाही दिली आहे. संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडितेच्या वडिलांना फोन करून झालेल्या प्रकरणी त्यांचे सांत्वन केले. संवादादरम्यान त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. त्याला त्याला फासावर लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्याचवेळी तुमच्या पोटचा गोळा गेलाय, आम्ही तुम्हाला कसे समजावू, कसे शांत करू? तुमचे सांत्वन कसे करावे हेच कळत नाहीये, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. न्यायालयाने त्याला ७ मे पर्यंत दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरोधात खून, बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नसरापूर प्रकरण जास्त दिवस न्यायालयात चालणार नाही. जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून लवकरात लवकर पाठपुरावा करून कारवाई करू, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाला दिला आहे. पीडित कुटुंबियांच्या राज्य सरकार पाठीशी आहे. पुणे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात नेण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले आहे.

उन्हाळाच्या सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना नसरापूर येथे घडली. नराधम आरोपीने याआधीही अशा प्रकारची दोन कृत्ये केल्याचे समोर आले आहे. आधीच्या गुन्ह्यांत तो जामिनावर बाहेर होता, असेही कळते. नसरापूर प्रकरणात जनभावना तीव्र असून गेली दोन पुणे शहर आणि ग्रामीण भागांत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आंदोलने होत आहेत. या प्रकरणाने अवघ्या राज्यभरात तीव्र संतापाचे पडसाद उमटले आहेत. अशा विकृत वैचरिकांना जागीच ठेचावे अशी सर्वसामान्यांकडून मागणी केली जात आहे.

Criminal has no right to live, Deputy CM Eknath Shinde tells victim’s father

महत्वाच्या बातम्या