Prashant Jagtap : पीएमपी बस खरेदीवरून वाद; उच्च न्यायालयात जाण्याचा प्रशांत जगताप यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

पुणे : Prashant Jagtap पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पीएमपीच्या बस खरेदीच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला असून, या प्रक्रियेला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याची भूमिका स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप यांनी जाहीर केली आहे.Prashant Jagtap

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पीएमपीच्या तुटीचा प्रस्ताव मांडला असताना, या बैठकीत जगताप यांनी संचालक मंडळाने मंजूर केलेल्या बस खरेदीला तीव्र विरोध दर्शवला. पीएमपीचे माजी अध्यक्ष म्हणून अनुभवाच्या आधारे त्यांनी या खरेदी प्रक्रियेवर अनेक आक्षेप घेतले.Prashant Jagtap



पुण्यात सध्या बीआरटी मार्ग काढण्याची प्रक्रिया सुरू असली तरी भविष्यात बीआरटी धोरणाबाबत स्पष्टता नसताना, उजव्या बाजूला दरवाजे असलेल्या बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. साध्या बसेसच्या तुलनेत या बसेसची किंमत प्रत्येकी सुमारे सहा लाखांनी अधिक असून, त्यांची आसन क्षमता देखील कमी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

या पार्श्वभूमीवर, अधिक खर्चिक आणि कमी क्षमतेच्या बसेस खरेदी करण्यामागील कारण स्पष्ट करावे, अशी मागणी जगताप यांनी केली आहे. पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीचा सविस्तर वृत्तांत पुढील दोन दिवसांत समोर येणार असून, त्यानंतर या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Dispute over PMP bus procurement; Prashant Jagtap warns of approaching the High Court

महत्वाच्या बातम्या