विशेष प्रतिनिधी
परभणी: जिल्ह्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय पक्का झाला असल्याचे बोलले जात आहे.ठाकरे गट सोडल्यानंतर भाजपामध्ये प्रवेश करायचा की,शिंदे गटात यावर संजय जाधव यांचा निर्णय पक्का होत नाहीये.
मागील दोन महिन्यांपासून संजय जाधव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याचा चर्चा सुरू आहेत.मुंबईत मातोश्री येथे परभणीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठिकला गैरहजर राहत त्यांनी आपले मनसुबे स्पष्ट केले होते.त्यानंतर अंबादास दानवे यांनी परभणीत मतदारसंघाचा दौरा करून, पक्षांतराचा आढावा देखील घेतला होता.
परभणीत येथे आयोजित एका कार्यक्रमात संजय जाधव यांनी पक्षांतराच्या चर्चांना उधाण देणारे वक्तव्य केले होते.ह्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांचे समर्थक असलेल्या गंगाप्रसाद अनेराव यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचल बांगडी केली.
भाजपाच्या जिल्हाध्यक्षांचा जाधवांना सल्ला..
संजय जाधव यांनी भाजपामध्ये प्रवेश करायचा की, शिंदेसेनेत? हा पूर्णपणे सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे.पण आता वेळ वाया घालवू नका.तुम्ही एक भाषणात राजकारण फक्त पैशाचे झाले आहे,असे चुकीचे म्हणालात.राजकारण पैश्याचे नाहीतर विकासाचे होत आहे. तुम्ही परभणी जिल्ह्याचे मागील बारा वर्षांपासून खासदार आहात, पण मागच्या बारा वर्षात आपल्याकडून काहीच विकास कामे झाले नाहीत,याची जाणीव आता तुम्हाला होऊ लागली आहे.विकास करायचा असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही,हे जाधवांच्या लक्षात आले आहे.त्यामुळे ते लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील,असा दावा भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी केला आहे.
एकूणच,काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी देखील संजय जाधवांना भाजपा प्रवेशाचे खुले आमंत्रण दिले होते.त्यामुळे खासदार संजय जाधव यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.
MP Sanjay Jadhav will say goodbye to the Thackeray group; but where will BJP or Shiv Sena go?
महत्वाच्या बातम्या
- ‘मला खोटं गोवलं’ आरोपीचा दावा फेटाळला; नसरापूर प्रकरणात तपास अधिक तीव्र
- पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा ३१ मेपर्यंत सुरू होण्याची शक्यता…
- विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार, अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद
- टीसीएस बीपीओ प्रकरण: निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अटकेची टांगती तलवार