पर्यायी मार्गांचा वापर करण्याची पोलीस प्रशासनाची ॲडव्हायझरी जारी…
विशेष प्रतिनिधी
पुणे : Nasrapur case नसरापूरमधील चिमुकलीच्या हत्येप्रकारणी राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला आमच्या ताब्यात द्या म्हणत पुणे शहरात नवले ब्रिज परिसरात सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याबाबत पुणे वाहतूक विभागाने सायंकाळी ७ वाजता तातडीची ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी केली आहे.Nasrapur case
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वडगाव ब्रिज येथे हॉटेल सुवर्णा समोर आंदोलन सुरू असल्यामुळे मुंबईकडून साताऱ्याकडे आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही लेन पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.Nasrapur case
या परिस्थितीत वाहतूक विभागाकडून वाहनचालकांनी नवले ब्रिजकडे जाणे टाळावे, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. जे वाहनचालक आधीच या मार्गावर आहेत, त्यांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे किंवा शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
नागरिकांमध्ये तीव्र संताप दिसत असून रास्ता रोको आंदोलन किती वेळ चालणार याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. त्यामुळे पुढील काही काळ तरी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, नसरापूर येथे घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आले आहेत. साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिक आणि पीडितेच्या नातेवाईकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला आहे. कालपासूनच स्थानिकांकडून आणि राजकीय सामाजिक व्यक्तींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आंदोलनामुळे मुळे झालेल्या वाहतूक कोंडीवर वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक प्रवास टाळावा आणि बाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीची माहिती तपासूनच मार्ग निवडावा, असेही सांगण्यात आले आहे.
सध्या नवले ब्रिज परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आंदोलन सुरू असल्यामुळे वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या दोन ते तीन तासांपासून सुरू असलेले हे आक्रमक आंदोलन थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यामुळे नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पोलीस प्रशासनासमोर देखील आंदोलनामुळे झालेल्या वाहतूक कोंडीचे मोठे आवाहन उभे राहिले आहे. आता नागरिकांच्या मागण्या पूर्ण कधी होणार? हे आंदोलन कधी थांबणार? त्या चिमुकलीला न्याय कधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे
Rasta Roko at Navale Bridge with ambulance for the young girl in the Nasrapur case; traffic on Mumbai–Bangalore highway completely shut down!”
महत्वाच्या बातम्या
- मराठी अनिवार्यतेवर सरकार ठाम; चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतीची शक्यता..
- प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार
- शिवसेनेत गोऱ्हे – कडूंचा नावाला विरोध? एकनाथ शिंदेच्या पुढचा पेच वाढला…
- धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन