विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister Fadnavis राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘सारथी’ पोर्टलवर विश्वासार्ह बियाण्यांचीच नोंद केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.Chief Minister Fadnavis
मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यात यंदा खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे आणि खतांचा पुरवठा मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा तुटवडा भासणार नाही. मात्र, वारंवार नकली किंवा बोगस बियाण्यांचे प्रकरण समोर येत असल्याने यंदा वेगळा प्रयोग करण्यात येत आहे.”
फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या ‘सारथी’ पोर्टलवर बियाण्यांची नोंदणी करावी लागते आणि ती नोंद ट्रॅसेबल असते. म्हणजेच त्या बियाण्याचे उत्पादन कुठे झाले, याचा मागोवा घेता येतो. “आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती की, केवळ विश्वासार्ह बियाण्यांनाच पोर्टलवर स्थान द्यावे. ही विनंती आता मान्य झाली असून, लवकरच पोर्टलवर फक्त प्रमाणित बियाण्यांचीच नोंदणी होणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विभागनिहाय हा पाऊस ७ ते १७ टक्क्यांनी अधिक असू शकतो. “पावसाचा खंड फारसा जाणवणार नाही. दीर्घकालीन हवामान अंदाज नेहमीच अचूक ठरतो. अल्पकालीन अंदाजात थोडे बदल शक्य आहेत,” असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
Reliable seeds now on ‘Saarthi’ portal; Information from Chief Minister Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर