Jalindar Supekar : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण कारागृह पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची पुण्यातून बदली

विशेष प्रतिनिधी

Pune News : वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) मृत्यू प्रकरणी आरोपी पती शशांक हगवणे यांचे मामा पुण्याचे कारागृह पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar)  यांची पुण्यातून बदली करण्यात आली आहे. सुपेकर यांना आता महाराष्ट्र होमगार्ड उपमहासमादेशक पदावर बदली करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुपेकर यांच्या विरोधात आरोप केले होते. त्यानंतर त्यांची चौकशी करून त्यांच्या बदलीचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्याच्या गृह विभागाने परिपत्रक काढून जालिंदर सुपेकर यांची आज बदली केली आहे.

या आदेशानुसार पुण्यातील कारागृह व सुधारसेवा विशेष पोलिस महानिरीक्षक पदावरुन जालिंदर सुपेकर यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. उपमहासमादेशक होमगार्ड, महाराष्ट्र राज्य या पदावर त्यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, सुपेकर यांच्याच सहीने सुशील आणि शशांकला शस्त्र परवाना 2022 मध्ये शस्त्रपरवाना मिळाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी, हगवणे बंधुंनी परवान्यासाठी खोटे पत्ते दिल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरे राजेंद्र हगवणे, पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि दीर असे चौघांना अटक करण्यात आली आहे. आज नीलेश चव्हाणला नेपाळच्या बॉर्डरवरून अटक केली आहे.

Vaishnavi Hagawane death case Jail Inspector General of Police Jalindar Supekar transferred from Pune

महत्वाच्या बातम्या