Sushma Andhare : वैष्णवी हगवणे प्रकरणात आणखी वाद, पाेलीस निरिक्षक शशिकांत चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; राज्यपालांकडे महाविकास आघाडीची तक्रार

विशेष प्रतिनिधी

पुणे : Sushma Andhare पुण्यातील वैष्णवी हगवणे हत्याकांड प्रकरणात दिवसागणिक नवनवे खुलासे होत असून, आता या प्रकरणात थेट खडक पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचं नाव समोर आलं आहे. त्यांच्यावर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप करत थेट राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.Sushma Andhare

महाविकास आघाडीच्या महिला आघाडीच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली आणि शशिकांत चव्हाण यांच्यासह आयजी जालिंदर सुपेकर यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राजेंद्र हगवणे याने ज्या थार गाडीचा वापर करून पलायन केलं, ती गाडी चौंधे यांच्या मालकीची होती. याच चौंधेंच्या दोन्ही सुनांनी पीआय शशिकांत चव्हाण यांच्याकडे छळवणुकीच्या स्पष्ट तक्रारी केल्या होत्या. मात्र, चव्हाण यांनी त्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं आणि कारवाई केली नाही.

विशेष बाब म्हणजे, हेच शशिकांत चव्हाण म्हणजे आयजी जालिंदर सुपेकर यांचे मेव्हणे आहेत. त्यामुळे प्रकरणात राजकीय आणि पोलिस यंत्रणांतील साखळी हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “शशिकांत चव्हाण यांचं अनेक बिल्डर साइट्सवर काम सुरू आहे आणि त्यांची तसेच सुपेकर यांची बेहिशोबी मालमत्ता आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे.”

लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विभागाचा निधी वळण्यात आला आहे. त्यामुळे सारथी, बार्टी, महाज्योती अशा तीनही ठिकाणच्या फेलोशीप मिळालेल्या नाहीत, तुम्ही लाडक्या बहिणींचे पैसे द्या पण वंचित घटकाचा निधी वळता केला जाऊ नये, हीदेखील मागणी केली, असेही सुषमा अंधारे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राज्य महिला आयोगासाठी एक पूर्णवेळ महिला अध्यक्षा मिळावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. ज्या पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार भरवतील, अशा अध्यक्षा काम करून शकत नाहीत. विशेषत: ज्यांना कायद्याचा परीघ माहित आहे, अशा महिला अध्यक्षा असाव्यात. सध्या आयोगात ज्या अध्यक्षा आहेत, त्यांच्याकडे कायद्याची कोणतीही पदवी किंवा त्यांनी कायद्याचा कोणताही अभ्यास केलेला नाही. त्यांमुळे त्यांना कायदा कळत नाही. त्या मेल पाठवताना सुमोटो म्हणतात, पण सुमोटो कसा केला जातो. हेही त्यांना कळत नाही. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. गेल्या सहा महिन्यांपासून महिला आयोगात इतर कोणत्याही सदस्याची पदे भरलेली नाहीत. त्यासंदर्भात आम्ही राज्यपालांशी चर्चा केली, असे अंधारे यांनी सांगितले.

More Controversy in Vaishnavi Hagwane Case, Serious Allegation Against Police Inspector Shashikant Chavan; Complaint of Mahavikas Aghadi to Governor

महत्वाच्या बातम्या