Raju Shetty : राजू शेट्टी यांनी समोर आणला जालिंदर सुपेकर यांचा आणखी एक कारनामा, अमिताभ गुप्ता यांच्या सोबत पाच कोटी रुपयांच्या खरेदीत गैरव्यवहार

विशेष प्रतिनिधी

पुणे : Raju Shetty वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी नाव समोर आलेले विशेष पोलीस महानिरीक्षक ( आयजी) जालिंदर सुपेकर आणि तत्कालीन पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी मिळून पाच कोटी रुपयांच्या खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.Raju Shetty

शेट्टींनी समाजमाध्यमांतून गौप्यस्फोट करत सांगितलं की, कैद्यांच्या दिवाळी फराळाच्या नावाखाली तब्बल 1,200 रुपये किलोची काजूकतली खरेदी केली, मात्र ती कैद्यांना मिळाल्याचे कुठेही दिसून आले नाही. प्रत्यक्षात कैद्यांना स्थानिक बाजारातील स्वस्त फराळ पुरवण्यात आला दरांमध्ये 40 ते 60 टक्क्यांची मोठी तफावत होती.

राज्यातील विविध कारागृहांतील रेशन व कॅन्टीन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून, गेल्या दिवाळीत सुमारे 5 कोटी रुपयांची खरेदी केल्याचं शेट्टी यांनी म्हटले आहे. या खरेदीसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट साहित्य खरेदी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काजूकतली हल्दीराम, चितळे बंधू वा काका हलवाई दराने खरेदी दाखवून स्थानिक फराळ देण्यात आला. हे स्पष्ट भ्रष्टाचार आहे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांनी 1200 रूपये किलोची काजूकतली खायला घातली मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही ……! राज्यातील कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिका-यांनी रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी कैद्यांना दिवाळीमध्ये जे फराळाचे साहित्य दिले त्या फराळाच्या साहित्याचे दर हल्दीराम ,काका हलवाई व चितळे बंधू यांच्या दर पत्रकाप्रमाणे होते. प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला या दरामध्ये जवळपास 40 ते 60 टक्के तफावत होती. गत दिवाळीत राज्यामध्ये जवळपास 5 कोटी रूपयाची खरेदी करण्यात आली आहे. सदरची खरेदी करण्यासाठी कोणतीही निवीदा प्रक्रिया करण्यात आली नाही. सोबत फराळाचे साहित्य व त्याचे दरपत्रक टाकले आहे यावरून कारागृहात किती अनागोंदी कारभार चाललेला आहे हे लक्षात येईल.

Raju Shetty brought to light another act of Jalinder Supekar, corruption in a purchase worth Rs 5 crore with Amitabh Gupta

महत्वाच्या बातम्या