Chandrahar Patil : ज्यांच्यासाठी युती पणाला लावली त्या पै. चंद्रहार पाटील यांचाही ठाकरेंना जय महाराष्ट्र

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्यासाठी युती पणाला लावली होती. अट्टाहासाने सांगलीची जागा लढविली. त्याच चंद्रहार पाटील यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आहे. Chandrahar Patil

काही दिवसांपूर्वीच सांगलीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली होती. मात्र त्यावेळी चंद्रहार पाटील म्हणाले होते की, मी अधिकृत भूमिका घेतली नसून माझ्या सहकाऱ्यांसोबत बोलून पुढचा निर्णय घेणार आहे. मात्र आता त्यांनी सरकारसोबत जाण्याचे कारण सांगितले आहे. Chandrahar Patil



चंद्रहार पाटील यांनी फेसबुकला एक पोस्ट पोस्ट केली असून म्हटले आहे की, राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच त्रुटी, अडचणी आणि गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे. परंतु, प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. त्यामुळे आता क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगलीच्या भाळवणीमध्ये 30 मे ला उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रहार पाटील यांनी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी चंद्रहार पाटील यांच्याकडून मंत्री सामंत यांना चांदीची गदा भेट म्हणून देण्यात आली होती. तेव्हापासूनच चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगली होती. यानंतर चारच दिवसांपूर्वी) शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील हे 9 जून रोजी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हिंमत असेल तर हा प्रवेश थांबवा, असे आव्हानच संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला दिले होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांना चांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाची उमेदवारी देण्यात आली. वास्तविक या ठिकाणी माजी मुख्यमंत्री वसंतददा पाटील यांचे नातू काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील इच्छुक होते. काँग्रेसच्या नेत्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही ठाकरेंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारासाठी ते अडूनच बसले होते. त्यामुळे शेवटी विशाल पाटील यांना अपक्ष लढावे लागले. विशाल पाटील यांचा विजय झाला आणि चंद्रहार पाटील यांची डिपॉझिट जप्त झाले.

Chandrahar Patil, for whom the alliance was at stake, also quit Thackeray.

महत्वाच्या बातम्या