Ajit Pawar : घटनेनंतर दोन दिवसांनी पाहणीला गेले आणि पत्रकारांवरच भडकले अजित पवार

 

पुणे : Ajit Pawar दोन दिवसांपूर्वीच मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पूल कोसळून दुर्घटना घडली आणि 4 जणांना आपले प्राण गमवावे लागेल. या दुर्घटनेनंतर अजित पवार दोन दिवसांनी पाहणी दौऱ्यासाठी गेले होते. त्यांना उशीरा येण्याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार पत्रकारावरच भडकले.Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेतील जखमी नागरिकांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्रीही आहेत. त्यामुळे पूल दुर्घटनेच्या दोन दिवसांनी अजित पवार पाहणी दौऱ्यावर असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला, मात्र अजित पवार भडकले.

पत्रकारांनी अजित पवारांना विचारले की, तुम्ही माळेगावच्या बैठकांमध्ये व्यस्त होता का? इकडे यायला इतका उशीर का झाला? पत्रकारांच्या या प्रश्नांवर अजित पवार भडकून म्हणाले की, हा विषय इथे घेऊ नका. यामुळेच मी तुमच्याशी बोलत नाही. मी इथे पाहणी करायला आलो आहे. मी माझं काम करत होतो. त्यामुळे पूल दुर्घटनेनंतर ताबडतोब मी कलेक्टरला सांगितलं की, मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसाला ताबडतोब मदत जाहीर करा आणि जखमींचा पूर्ण खर्च राज्य सरकारकडून करा. आम्ही आमचं काम करत असतो. मात्र कधी कधी काही जण टीआरपी वाढवण्याकरता आमच्या तोंडी काहीही शब्द टाकतात,

अजित पवार म्हणाले की, पेट्रोल सोडतो म्हटलं की, पेट्रोल चोरतो म्हणून शब्द टाकतात. इतका गलथान कारभार चाललेला आहे. म्हणून मी जाहीर केलं की, ‘च’ हा शब्द माझ्या तोंडातून निघाला असेल तर मी राजकारण सोडून देईन. मग आता ज्यांनी बातमी दाखवली त्यांनी आपण चुकीची बातमी दाखवली म्हणून हे क्षेत्र सोडून द्यावं.

Ajit Pawar went to inspect the incident two days after the incident and lashed out at the journalists.

महत्वाच्या बातम्या