विशेष प्रतिनिधी
मुंबई : Bharat Gogavale रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात सुरू झालेला संघर्ष थांबायला तयार नाही. आता तर अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी मंत्री भरत गोगावले यांचा अघोरी पूजेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.Bharat Gogavale
पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी काही व्हिडीओ आणि फोटो शेअर भरत गोगावले यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केल्याचा दावा केला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा मांत्रिकासोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. म्हणजे सूरज चव्हाण यांनी व्हिडीओ पोस्ट करताना पालकमंत्रिपदाचा उल्लेख केला आहे.
सूरज चव्हाण यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, भरत गोगावले फक्त टॉवेलवर एका खुर्चीवर बसलेले आहेत. त्यांच्यासमोर काळे कपडे घातलेला एक मांत्रिक आणि दोन जण भगवी वस्र घालून उभी आहेत. याशिवाय भरत गोगावले यांच्यासमोर असलेल्या टेबलावर काही वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. काळे कपडे घातलेला मांत्रिक भरत गोगावले यांच्यासोबत संवाद साधून काही विधी करताना दिसत आहे. मात्र व्हिडीओमध्ये दोघांमध्ये काय संवाद होतो, हे ऐकू येत नाही. महत्त्वाचे म्हणजे सूरज चव्हाण यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना “बाबा भरतशेठ + आघोरी विद्या = पालकमंत्री?” असे म्हटले आहे. याचा अर्थ रायगडचे पालकमंत्रिपद मिळावे यासाठी भरत गोगावले पूजा करत असल्याचा दावा सूरज चव्हाण यांनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी दावा केला होता की, 18 ऑक्टोबर 2024 रोजी भरत गोगावले यांनी उज्जैन येथील बागलामुखी देवीच्या मंदिरात 11 महाराजांसोबत पूजा केली होती. त्यानंतर त्यांना आपल्या घरी बोलावून पूजा घातली होती. तुमचा तुमच्या कामावर विश्वास नाही का? मग अशा पूजांचा आधार का घेतला? असे प्रश्न उपस्थित करत वसंत मोरे म्हणाले होते की, या पूजेसाठी इतर राज्यातून मांत्रिक बोलावण्यात आले होते. त्या पूजांचे व्हिडीओ आमच्याजवळ उपलब्ध आहेत. जर गोगावले यांनी ही गोष्ट नाकारली, तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल करू.
https://x.com/surajvchavan/status/1935338684511109279?t=bjkDGS0wfyRE2rOvrGSbzA&s=19
विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेवर आली. मात्र तेव्हापासून आतापर्यंत अद्यापही रायगड जिल्ह्याला अद्यापही पालकमंत्री मिळालेला नाही. कारण रायगडच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शिवसेना शिंदे गटाने नाराजी व्यक्त केल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धुसफूस सुरू असल्याने अद्यापही रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा मांत्रिकासोबतचा व्हिडीओ पोस्ट करत पुन्हा पालकमंत्रिपदाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Ajit Pawar’s leader posted a video of Bharat Gogavale performing Aghori puja in the Mahayuti itself.
महत्वाच्या बातम्या
- IndusInd bank ‘इंडसइंड’ नंतर आता ‘ही’ बलाढ्य बँक RBIच्या रडारावर; कधीही होवू शकते कारवाई!
- Raj Thackeray : गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही, मग महाराष्ट्रात सक्ती का? राज ठाकरे यांचा सवाल
- Dada Bhuse : राज्यात हिंदी नाही मराठीच अनिवार्य, विद्यार्थी पाठीमागे राहू नये यासाठी त्रिभाषा सूत्र, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले स्पष्ट
- Dhule extortion case : धुळे खंडणी प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करा अन्यथा नाईलाजाने या प्रकरणातील इतर स्फोट, संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा