विशेष प्रतिनिधी
बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. सगळीच पदे स्वतःकडे घ्यायची नसतात, कार्यकर्त्यांनाही द्यायची असतात असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे. Malegaon battlefield
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, शरद पवार यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात आपल्याला अजित पवार किंवा भाजप यांच्यासोबत जायचे नसल्याचा स्पष्ट संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेविषयी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती, पण ठीक हे झालं हे झालं, असे शरद पवार यांनी म्हटले.
अजित पवार स्वतः या कारखान्याची संचालक पदाची निवडणूक लढवीत आहेत. आपण कारखान्याचे अध्यक्ष झालो तर सभासदांना फायदा होईल असेही त्यांनी म्हटले आहे. यावरून मी सहकारी संस्थेमध्ये कधीही पद घेतले नाही. सगळीच पदे स्वतः ग्यायची नसतात. कार्यकर्त्याना द्यायची असतात, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हा स्थानिक प्रश्न आहे. आजुबाजूला जे तालुके आहेत, त्यांचे लक्ष इथे नाही. माळेगाव सहकारी साखर कारखाना माझ्या नावाने ओळखला जातो. या निवडणुकीत आमची टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती, आजही नाही. एक विशिष्ट स्थिती झाली. लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती, पण ठीक हे झालं ते झालं. पण हे दीर्घकालीन आम्ही समजत नाही. हा या कारखान्याचा तात्पुरता 19 हजार सभासदांपुढील प्रश्न आहे. बारामतीत सूतगिरणी झालीच नाही. एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता परंतु आता कापूस इथे राहिला नाही. चंद्रराव तावरे यांच्याशी काही लोकांचे बोलणं झालं होते. त्यांना अडचण होती, त्यामुळे आम्ही ताणले नाही, असे शरद पवार म्हणाले. Malegaon battlefield
Pawar uncle and nephew face off in Malegaon battlefield, Sharad Pawar lashes out at Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी