West Bengal : पश्चिम बंगालमध्ये मोगलाई! ममता बॅनर्जींना प्रश्न विचारणाऱ्या डॉक्टरसह भाजप प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्र्यांना अटक

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये मोगलाई! ममता बॅनर्जींना प्रश्न विचारणाऱ्या डॉक्टरसह भाजप प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्र्यांना अटक

West Bengal

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अक्षरशः मोगलाई माजवली आहे. ऑक्सफर्डमधील एका कार्यक्रमात ममतांना अडचणीचा प्रश्न विचारणाऱ्या लंडनस्थित डॉक्टरसह त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यात आली. West Bengal

यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार आणि लंडनस्थित डॉक्टर राजतशुभ्र बंधोपाध्याय यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

केंद्रीय मंत्री मजुमदार हे कोलकात्यात हरिश मुखर्जी रस्त्यावरील डॉ. बंधोपाध्याय यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. याच दरम्यान पोलिसांनी त्यांचा ताफा अडवला आणि सांगितले की डॉक्टर घरी नाहीत. मात्र, भाजपच्या म्हणण्यानुसार डॉक्टर घरी होते आणि एक तासापासून बैठकीसाठी वाट पाहत होते. नंतर डॉक्टर स्वतः घरी बाहेर आले आणि रस्त्यावरच भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली. याचवेळी पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

बांधोपाध्याय हे ब्रिटनचे नागरिक असून त्यांच्या मूळ कुटुंबाचे मूळ दक्षिण कोलकात्यात आहे. काही महिन्यांपूर्वी ऑक्सफर्डमधील ‘केलॉग कॉलेज लेक्चर’ दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना थेट प्रश्न विचारला होता की तुमच्या कार्यकाळात बंगालमध्ये कोणतीही एक मोठी औद्योगिक गुंतवणूक आली आहे? या प्रश्नावर सभागृहात गोंधळ उडाला आणि सुरक्षा यंत्रणेला हस्तक्षेप करावा लागला होता.

या पार्श्वभूमीवरच भाजपने आरोप केला आहे की, ममता सरकार पोलिसांचा वापर करून विरोधकांचे आणि सरकारविरोधात बोलणाऱ्यांचे आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या राज्य युनिटने ‘X’ या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले, “एक केंद्रीय मंत्री एखाद्या मान्यवर डॉक्टरला भेटायला जातो आणि त्याला भेटूही दिलं जात नाही, हीच कायद्याचे राज्य नसल्याची सर्वोच्च सीमा आहे.”

डॉ. बंधोपाध्याय यांना अटक झाल्यावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले , “मी ब्रिटिश नागरिक आहे, तरी मला गुन्हेगारासारखी वागणूक दिली गेली. केंद्रीय मंत्र्याला भेटणं हे काय गुन्हा आहे का? पोलिसांनी अटक का केली याचं उत्तर द्यावं लागेल.”

सुकांत मजुमदार यांनी पोलिस व्हॅनमध्ये चढवताना पत्रकारांना सांगितले, “आम्हाला अटक का केली, हेच समजत नाही. जगात कुठेही अशा प्रकारची वागणूक दिली जात नाही.”

भाजप नेते सौरव सिकदर यांनी याला “राज्य प्रायोजित गुंडशाही” असे संबोधले. त्यांनी म्हटलं, “एका डॉक्टरला भेटायला गेलेल्या मंत्र्यालाही अटक केली जाते, ही म्हणजे पोलिसयंत्रणेला राजकीय शस्त्र बनवणं आहे.”

दरम्यान, तृणमूल काँग्रेसने पोलिसांची कारवाई योग्य असल्याचे सांगत भाजपवर टीका केली आहे. पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, “भाजप जाणीवपूर्वक संवेदनशील परिसरांमध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. संबंधित डॉक्टरने यापूर्वीही वादग्रस्त विधाने केली आहेत. पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई केली.”

या घटनेनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, ममता सरकार विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. West Bengal

West Bengal! BJP state president, Union minister along with doctor who questioned Mamata Banerjee arrested

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023