विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Rahul Gandhi निवडणूक आयोग निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ 1 वर्षात नाही तर 45 दिवसांत डिलीट करणार असल्याचा निर्णयावर हे मॅच फिक्सिंग असल्याचे स्पष्ट दिसत असून फिक्स केलेली निवडणूक लोकशाहीसाठी विष असल्याची टीका काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.Rahul Gandhi
राहुल गांधी यांनी एका हिंदी दैनिकाच्या डिजिटल बातमीचा स्क्रीनशाॅट शेअर करत ट्विट केलं आहे. यामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राहुल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मतदार यादी? मशीन-रीडेबल स्वरूपात दिली जाणार नाही. सीसीटीव्ही फुटेज? कायदा बदलून लपवले. निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ? आता ते 1 वर्षात नाही तर 45 दिवसांत नष्ट केले जातील. ज्याला उत्तर हवे होते, तो पुरावे नष्ट करत आहेत. त्यामुळे स्पष्टपणे दिसून येते, मॅच फिक्स आहे आणि फिक्स्ड निवडणूक लोकशाहीसाठी विष आहे.
हुल गांधी यांनी 15 दिवसांपूर्वी इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी दैनिकासह मराठी दैनिकांमध्ये लिहिलेल्या लेखामध्ये पाच 5 स्टेपमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता. राहुल गांधी यांनी एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड, बनावट मतदार, बनावट मतदान, टार्गेट बुथ रिगिंग आणि CCTV/पुरावे लपवण्याचे सांगत फिक्सिंगचा आरोप केला. महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक 7.83 टक्के मतदान टक्केवारी वाढणे ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचे म्हटले होते. त्यांनी या सर्व घडामोडींना “Match-fixing” असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, आता निवडणुकीदरम्यान घेतलेले फोटो, सीसीटीव्ही फुटेज, वेबकास्टिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग फक्त 45 दिवसांसाठी सुरक्षित ठेवले जातील. त्यानंतर सर्व डेटा डिलीट केला जाईल. निवडणूक आयोगाने (EC) 30 मे रोजी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की जर कोणत्याही मतदारसंघातील निवडणूक निकालाला न्यायालयात आव्हान दिले गेले नाही, तर 45 दिवसांनी हा सर्व डेटा नष्ट करावा. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की अलीकडेच काही उमेदवार नसलेल्यांनी निवडणूक व्हिडिओ विकृत करून चुकीचे कथन पसरवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला. काँग्रेसने आयोगाच्या या नियमाला विरोध केला आहे. पक्षाने म्हटले आहे की यापूर्वी हा डेटा एक वर्षासाठी सुरक्षित ठेवण्यात आला होता, जेणेकरून लोकशाही व्यवस्थेत कधीही त्याची चौकशी करता येईल. आयोगाचा हा नियम पूर्णपणे लोकशाहीविरुद्ध आहे. तो तत्काळ मागे घ्यावा. यापूर्वी 20 डिसेंबर 2024 रोजी केंद्र सरकारने मतदान केंद्राचे सीसीटीव्ही, वेबकास्टिंग आणि उमेदवारांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिकरित्या उघड करण्यापासून रोखण्यासाठी निवडणूक नियमांमध्ये बदल केले.
Rahul Gandhi on Election Commission’s decision says this is match fixing
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी