विशेष प्रतिनिधी
दुबई : इराण आणि इस्राएलमधील युद्धात अमेरिकेने हस्तक्षेप करून इराणच्या तीन अणुकेंद्रांवर हल्ले केले. यामुळे मध्यपूर्वेतील युद्धजन्य स्थिती अधिकच धगधगत असताना, इराणच्या संसदेनं जगाला हादरवणारा निर्णय घेतला आहे. इराणने ‘हॉर्मूझ सामुद्रधुनी’ तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असून, या निर्णयामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. Strait of Hormuz
हॉर्मूझ सामुद्रधुनी ही फारसी आखात आणि अरबी समुद्राला जोडणारी एक अत्यंत महत्त्वाची समुद्रमार्गिका आहे. दररोज जवळपास २० दशलक्ष बॅरल कच्चे तेल या सामुद्रधुनीतून बाहेरील देशांत जात असते. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, इराक, कुवैत आणि कतारसारख्या देशांचा संपूर्ण तेलनिर्यात प्रवाह याच मार्गावर अवलंबून आहे.
इराणच्या संसदेत राष्ट्रीय सुरक्षाविषयक समितीचे प्रमुख मोजतबा जोनौरी यांनी या प्रस्तावावर भाष्य करत सांगितले की, “अमेरिका व इस्रायलकडून आमच्या अणु व लष्करी ठिकाणांवर सुरू असलेल्या आक्रमणांना उत्तर देण्यासाठी हा निर्णय आवश्यक आहे.” संसदेत बहुमताने हा प्रस्ताव संमत करण्यात आला असून, इराणी क्रांतीकारी गार्ड (IRGC) लवकरच या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू करणार आहे.
या निर्णयामुळे जगातील कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये त्वरित ८% वाढ झाली आहे. अमेरिका, युरोपियन युनियन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातने या निर्णयावर तीव्र चिंता व्यक्त करत तात्काळ सामुद्रधुनी खुली ठेवण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “इराणचा हे पाऊल जागतिक व्यापाराला आणि तेलपुरवठ्याचा गळा घोटणारे आहे. याची किंमत इराणला चुकवावी लागेल. सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री अब्दुलअझीज बिन सलमान यांनी या निर्णयाला ‘तेल युद्धाची सुरुवात’ असे म्हटले आहे.
भारत सध्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८५% आयात करत असून, त्यातील बहुतांश भाग आखाती देशांतून येतो. हॉर्मूझ सामुद्रधुनी बंद झाल्यास, भारताला पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल. त्यामुळे तेल दरवाढ, वाहतूक खर्च आणि महागाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ दखल घेत इराण व अमेरिकेला शांतता आणि वाटाघाटीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. भारतीय नौदलाला INS Trikand आणि INS Talwar यांना सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून भारतीय जहाजांचे रक्षण करता येईल.
हॉर्मूझ सामुद्रधुनी बंद होणे म्हणजे केवळ समुद्री मार्ग बंद होणे नाही, तर जगाच्या ऊर्जा सुरक्षेवर मोठा आघात आहे. या निर्णयामुळे इस्रायल-इराण युद्ध अधिकच व्यापक होण्याची शक्यता असून, अमेरिका आणि आखाती देशही प्रतिउत्तर देऊ शकतात. पुढील २४ तासांत इराण सामुद्रधुनीत युद्धनौका तैनात करणार आहे. अमेरिका व सौदी अरेबियाही संयुक्त नौदल मोहिमेसाठी चर्चा करत आहेत.
Shocking decision of Iran parliament; Order to close Strait of Hormuz
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी