Malegaon Sugar Factory Election Result : माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचा दणदणीत विजय; ब वर्गातून ९० टक्क्यांहून अधिक मते मिळवत आघाडी

Malegaon Sugar Factory Election Result : माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचा दणदणीत विजय; ब वर्गातून ९० टक्क्यांहून अधिक मते मिळवत आघाडी

Malegaon Sugar Factory Election Result

विशेष प्रतिनिधी

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ब वर्ग गटातून जबरदस्त विजय मिळाला आहे. १०१ वैध मते असून त्यातील तब्बल ९१ मते अजित पवार यांच्या पारड्यात पडली, म्हणजेच त्यांनी ९० टक्क्यांहून अधिक मते मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. Malegaon Sugar Factory Election Result

या निवडणुकीत सहकारी संस्थांचा समावेश असलेल्या ब वर्गातून मतदान झाले. या गटातून अजित पवार हे स्वतः उमेदवार होते. त्यांनी सुरुवातीच्या मतमोजणीतच विजय मिळवला.

या निवडणुकीसाठी एकूण चार पॅनेल्स रिंगणात होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवार आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा बचाव पॅनेल, चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनेल, आणि शेतकरी संघटनेचे कष्टकरी शेतकरी पॅनेल.

निवडणुकीत ८८.४८ टक्के मतदान झाले. अ वर्गात १९,५४९ मतदारांपैकी १७,२९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये १२,८६२ पुरुष आणि ४,४३४ स्त्रिया होत्या.

ब वर्गात मात्र १०२ पैकी १०१ जणांनी मतदान केले असून यामध्ये ९९ पुरुष आणि २ स्त्रियांचा समावेश आहे. मतदानाचा टक्का ९९.०२ इतका उच्च होता.

या निवडणुकीत एकूण ९० उमेदवार रिंगणात असून २१ संचालक निवडले जाणार आहेत. सुरुवातीपासूनच लक्ष लागलेल्या या निवडणुकीत अजित पवारांचा पहिला विजय निर्णायक ठरला आहे. Malegaon Sugar Factory Election Result

Ajit Pawar’s resounding victory in Malegaon Sugar Factory Election Result Leading by getting more than 90 percent votes from B category

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023