Pramod Kondhare : महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या प्रमोद कोंढरे याला अटक

विशेष प्रतिनिधी

पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौऱ्यात महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन करून विनयभंग करणारा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी प्रमोद कोंढरे (Pramod Kondhare) याला पोलिसांनी अटक केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित पुणे दौऱ्यादरम्यान हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. पुणे शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नियोजित दौऱ्यात कोंढरे यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले. कोंढरे यांनी महिला पोलीस अधिकारी यांना पाठीमागून धक्का दिला. हा संपूर्ण प्रकार घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेनंतर कोंढरे (Pramod Kondhare) याच्याविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.



दरम्यान, कोंढरे यांनी सर्व आरोप फेटाळले कोंढरे यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याला माझा कुठला ही प्रकाराचा धक्का लागला नाही, असे कोंढरे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले.मात्र पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दरम्यान, यावर संताप व्यक्त करताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, लाडक्या बहिणीचे रक्षणाच्या बाता मारणारे फडणवीससाहेब, वर्दीतील महिला अधिकारी सुद्धा सुरक्षित नाहीत.
संबंधित खात्याचे मंत्री म्हणून आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण या पीडितेला न्याय कसा देणार आहात? प्रमोद कोंढरेची हकालपट्टी होणार की नाही?

मात्र प्रमोद कोंढरे याला तत्काळ पदमुक्त करण्यात आले असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या आमदार चित्रा वाघ यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, यासंदर्भात मी पुण्याचे भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे जी यांच्याकडून माहीती घेतली असता संबंधित पदाधिकाऱ्याला तात्काळ पदमुक्त केल्याची माहीती त्यांनी दिली इतकच नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील करण्यात आली आहे.
अर्थात,आम्ही इतक्यावरच थांबणार नाही त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी पाठपुरावा करणार आहे.

Pramod Kondhare arrested for molesting a female police officer

महत्वाच्या बातम्या