विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (Shubanshu Shukla) यांनी अमेरिकेच्या स्पेसएक्स आणि अॅक्सिओम स्पेस यांच्या Axiom-4 (Ax-4) मोहिमेअंतर्गत अंतराळात झेप घेतली आहे. शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
या मोहिमेचे प्रक्षेपण अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधूमन करण्यात आले. या मोहिमेसाठी शुंभाशू शुक्ला आणि त्यांच्या टीमने स्पेसएक्सच्या फाल्कन-९ या रॉकेटने उड्डाण केले. या मोहिमेसाठी शुभांशू शुक्ला २९ मे रोजी उड्डाण घेणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही मोहीम लांबणीवर पडली होती. अखेर बुधवारी (२५ जून) शुभांशू शुक्ला यांच्यासह ४ अंतराळवीरांनी अवकाशात झेप घेतली आहे.
Axiom-4 ही मोहीम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राकेश शर्मा यांच्यानंतर शुभाशूं शुक्ला या मोहिमेचे प्रतिनिधीत्व करणार पहिले भारतीय ठरले आहेत. भारताच्या अंतराळातील वाढती ताकद आणि जागतिक सहकार्याचे प्रतीक म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे. या मोहिमेसाठी शुभांशू शुक्ला पायलट म्हणून काम पाहणार आहेत.
या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर तीन आंतरराष्ट्रीय अंतराळवीर नासाच्या अंतराळवीर आणि Ax-4 मोहिमेच्या प्रमुख पेगी व्हिटसन, तसेच पोलंडचे स्लावोस उजनास्की-विस्निवेस्की आणि हंगेरीचे तिबोर काबू सहभागी झाले आहेत. ही मोहीम १४ दिवसांची असणार आहे. यांतर्गत चारही अंतराळवीर १४ दिवस अंतराळात राहून विविध वैज्ञानिक, जैववैज्ञानिक आणि अभियांत्रिक प्रयोग करणार आहेत. या मोहिमेदरम्यान शुभांशू शुक्ला अंतराळात भारतीय संस्कृतीच्या विविध कलाकृतींचे आणि योगासनांचे सादरीकरण करणार आहेत.
Indian Air Force Group Captain Shubanshu Shukla’s space flight
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti :