विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आमच्यासाठी देश सर्वप्रथम आहे. पण आता काही लोक मोदी प्रथम आणि देश द्वितीय असल्याचे म्हणत आहेत. तर आम्ही त्यात काय करणार?”, असा टोला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ज्येष्ठ खासदार शशी थरुर यांना लगावला आहे. Mallikarjun Kharge
कॉंग्रेसचे ज्येष्ठ खासदार, कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे शशी थरूर आणि पक्षाचे संबंध सध्या ताणलेले आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर थरुर अनेक देशांमध्ये जे प्रतिनिधी मंडळ पाठवण्यात आले होते, त्यापैकी एकामध्ये थरूर यांचा देखील सहभाग होता. त्यांनी अनेकवेळा सरकारची बाजू भक्कमपणे मांडल्याचे पाहायला मिळाले, याबरोबरच त्यांनी अनेकदा पाकिस्तानला देखील उघडे पाडले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची स्तुती देखील केली. याचमुळे आता त्यांच्यावर काँग्रेसमधील काही नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे.
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रासाठी लेख लिहिला होता, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. त्यामुळे आता दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना याबाबच प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, “मला इंग्रजी भाषा फार कळत नाही. थरुर यांची इंग्रजी भाषेवर चांगली पकड आहे. त्यामुळचे त्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्यपद देण्यात आलेले आहे. ऑपरेशन सिंदूर झाले, त्यावेळी संपूर्ण विरोधी पक्ष आणि आम्ही भारतीय लष्कराच्या आणि सैनिकांच्या पाठीशी असल्याचे सांगत होतो. .
राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांनी अप्रत्यक्ष टोला लगावल्यानंतर लागलीच आता शशी थरुर यांची एक खोचक पोस्ट समोर आली आहे. या पोस्टच्य माध्यमातून त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. “Don’t ask permission to fly. The wings are yours. And the sky belongs to no one…” म्हणजेच, “उडण्यासाठी परवानगी मागत बसू नका. पंख तुमचे आहेत आणि आकाश कोणाचेही नसते.” असे त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे. थरुर यांनी केलेल्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. तर थरुर यांनी ही पोस्ट नेमकी का आणि कोणत्या कारणामुळे केली? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
Mallikarjun Kharge’s attack on his own MP
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी