विशेष प्रतिनिधी
कोलकाता : कोलकात्यातील एका नामांकित विधी महाविद्यालयात घडलेल्या बलात्काराच्या धक्कादायक प्रकाराची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून (सुओ मोटू) दखल घेतली आहे. या प्रकरणात एका विधी विद्यार्थिनीवर दोन सध्याच्या विद्यार्थ्यांनी आणि एका माजी विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या आवारातच सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. हे विध्यार्थी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी संबंधित आहेत. Gang Rape Kolkata
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी या घटनेबाबत कोलकाता पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले असून, त्यांनी यामध्ये आपली तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कोलकाता पोलिसांनी घट नेचा संपूर्ण अहवाल ३ दिवसांच्या आत सादर करावा. पीडितेला तत्काळ वैद्यकीय, मानसिक आणि कायदेशीर मदत देण्यात यावी. आयोगाने राज्य सरकारला भारतीय दंड संहितेच्या कलम ३९६ अंतर्गत पीडितेला भरपाई देण्यास सांगितले आहे.
२५ जून रोजी, कोलकाता लॉ कॉलेजच्या २४ वर्षीय विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार केली होती. कॉलेजचा माजी विद्यार्थी मनोजित मिश्रा, आणि सध्याचे विद्यार्थी झैब अहमद आणि प्रमित मुखोपाध्याय यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. मनोजितने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. तिने नकार दिल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी कोलकाता येथून तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्यावर बीएनएसच्या कलम १२७(२)/७०(१)/३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ जून रोजी कोलकाताच्या अलीपूर न्यायालयाने तिन्ही आरोपींना १० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपींच्या मोबाइल फोनवरून बलात्काराचे व्हिडिओदेखील सापडले आहेत. हे तिन्ही आरोपी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी परिषदेशी संबंधित आहेत.
महाविद्यालयाच्या गार्ड रूममध्ये बलात्काराचा प्रकार घडला. माझ्यावर बलात्कार करताना त्याने माझे व्हिडिओ बनवले आणि मला ब्लॅकमेल केले. प्रमीत आणि झैद हे सर्व पाहत होते. मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मनोजितने मला हॉकी स्टिकने मारहाण केली. मी रात्री १० वाजता खोलीतून बाहेर पडू शकले. बाहेर येताच मी माझ्या वडिलांना फोन करून संपूर्ण कहाणी सांगितली, असे या विद्यार्थिनीने सांगितले.
National Commission for Women orders suo motu inquiry into gang rape of law student in Kolkata
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी