MNS : मनसेच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेची कलाकारांना धमकी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : हिंदीच्या कथित सक्तीच्या विरोधात सुरुवसलेल्या आंदोलनात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धमक्याही सुरू केल्या आहेत. चित्रपटाचे शूटिंग रद्द करून मोर्चात सहभागी व्हावे अशी विनंतीच्या स्वरूपात धमकी दिली आहे. MNS

राज्यात शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येत 5 जुलै रोजी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाची तयारी सुरू झाली असून दोन्ही पक्षांकडून जोरदार नियोजन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधीच मराठी कलाकार, क्रीडापटूंनाही यामध्ये सहभागी होण्याचे आव्हान केले होते.



यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीदेखील मराठी कलाकारांना आवाहन केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हणाले की, “ज्या मराठी भाषेमुळे, प्रेक्षकांमुळे आपण मोठे झालो त्याची आठवण, कृतज्ञता म्हणून सर्वांनी 5 जुलै च्या मोर्चात सहभागी व्हावे. त्यासाठी कृपया 5 जुलैला मराठी मालिका, चित्रपट यांचे शुटींग बंद ठेवावे ही विनंती.” असे म्हणत त्यांनी मराठी कलाकारांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाकार हे मराठीच्या मुद्यावर पुढे येत नाहीत अशी टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ही विनंती करण्यात आली आहे.

मनसेकडून बाळा नांदगावकर यांना मोर्चाच्या आयोजनासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून अनिल परब सक्रिय असून वरूण सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्या भेटीगाठी होत आहेत. संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरे यांचीही भेट झाली.

MNS threatens artists to participate in MNS march

महत्वाच्या बातम्या