Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा स्टंट, निवडणुक आल्या की बाहेर आणि संपल्या की बिळात, परिणय फुके यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

गोंदिया : Manoj Jarange निवडणुक आल्या की मनोज जरांगे बाहेर येतात आणि निवडणुक संपले की परत बिळात जातात आणि ते स्टंट मारतात. त्यांना मराठा आरक्षणाशी काही देणंघेणं नाही, असा हल्लाबोल भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे.Manoj Jarange

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकींच्या पूर्वी मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. यावरुन आता भाजप नेते व आमदार परिणय फुके यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे.

फुके यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले की, जरांगे यांनाआपलं राजकारण करायचं आहे आणि मराठ्यांची दिशा भूल करायची आहे. पण मराठा समाज आता जागृत झाला आहे.

राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंवर निशाणा साधताना परिणय फुके म्हणाले की, “म मराठीचा… की महानगरपालिकेचा म.. असा सवाल त्यांनी ठाकरे बंधूंना विचारला. जेव्हा निवडणूक येतात तेव्हा यांचा मराठी प्रेम जागृत होतो अशी टीका केली आणि दोन्ही ठाकरे बंधूंची मुलं कोणत्या माध्यमातून शिकले आहेत? बोलताना दिवसभर इंग्रजी बोलतात आणि रात्री इंग्रजी पितात निवडणुकीच्या वेळी लोकांची दिशाभूल करता.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. परिणय फुके म्हणाले की, दोन्ही भाऊ एकत्र येऊन काही होत नाही. दोन्ही भाऊ एकत्र यायला पाहिजे तर काही होऊ शकेल.

Manoj Jarange’s stunt, he was out when the elections came and in the hole when they were over, allegation by Parinay Phuke

महत्वाच्या बातम्या