विशेष प्रतिनिधी
नाशिक : North Maharashtra उत्तर महाराष्ट्रात महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून, विरोधी पक्षांतील अनेक प्रभावशाली नेते भाजपाच्या वाटेवर आहेत. भाजपात प्रवेशाची लाट उसळली असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक गढ एकामागून एक ढासळताना दिसत आहेत.North Maharashtra
नुकताच उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार काँग्रेसचे कुणाल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अपूर्व हिरे भाजपात प्रवेश करत आहेत. १ आणि २ जुलै रोजी हे पक्षप्रवेश अनुक्रमे मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पार पडणार असून, या घडामोडींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
कुणाल पाटील हे माजी मंत्री स्व. रोहिदास पाटील यांचे पुत्र असून त्यांच्या कुटुंबाचा काँग्रेसशी तीन पिढ्यांपासून संबंध आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. सुरुवातीला त्यांनी या चर्चांना नकार दिला होता. मात्र, कार्यकर्त्यांचा आग्रह आणि भाजपकडून मिळालेले स्पष्ट आमंत्रण यामुळे त्यांनी अखेर १ जुलै रोजी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाटील यांनी स्पष्ट केले की, २०१४ आणि २०२४ च्या निवडणुकांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पक्षात येण्याचे आमंत्रण दिले होते. आता कोणतीही अट किंवा आश्वासन न घेता, केवळ कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे ते भाजपात प्रवेश करत आहेत. या निर्णयामागे कोणतीही पदलालसा नाही, असेही त्यांनी नमूद केले.
२ जुलै रोजी नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे हेही भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांना फोन करून प्रवेशासाठी आमंत्रित केले असून, यासंदर्भात हिरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी मुंबईत बैठकही घेतली. हिरे यांचा भाजप प्रवेश हा केवळ वैयक्तिक राजकीय निर्णय नसून, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्थिरतेचा व भाजपच्या विकासाभिमुख धोरणांचा परिणाम मानला जात आहे. नाशिकमधील राष्ट्रवादीचा प्रभाव कमी होत चालल्याचेही हे संकेत आहेत.
Wave of BJP entry in North Maharashtra; Congress stronghold is collapsing
महत्वाच्या बातम्या
- Harshawardhan Sapkal : गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी? काँग्रेसचा सवाल
- Ashish Shelar काँग्रेसने आणले त्रिभाषा सूत्र, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मान्यता, आशिष शेलार यांचा दावा
- filming devotees : भक्तांच्या खासगी आयुष्याचे चित्रीकरण करणाऱ्या भोंदू बाबाला अटक
- Shiv Sena : नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला गळती, महानगरप्रमुख शिंदे गटात