Assembly Monsoon Session 2025 : त्रिभाषा सूत्र मीच स्वीकारले, मी खोटे बोललो, कमॉन किल मी, उद्धव ठाकरेंच्या विरोधात शिंदे गटाचे आंदोलन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Assembly Monsoon Session 2025) पहिल्याच दिवशी सत्ताधारी शिंदे गटाने शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले. ‘त्रिभाषा सूत्र मीच स्वीकारले, मी खोटं बोललो, कमॉन किल मी’ अशा घोषणा देत शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर ठाकरेंच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.



मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनीच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा (NEP) स्वीकार करत त्रिभाषा सूत्राला मान्यता दिली होती, हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन करणारे ठाकरेंनीच हिंदी शिक्षण सक्तीच्या धोरणावर स्वाक्षरी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी यासंदर्भातील कागदपत्रे आणि पुरावे सादर केले होते, असा आरोप करण्यात येत आहे.

रोजगार हमी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते भरत गोगावले म्हणाले, मराठी भाषेच्या विरोधात उद्धव ठाकरे यांची नौटंकी सुरू होती, ही वस्तुस्थिती आहे. या संबंधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जो निर्णय घेतला आहे तो महाराष्ट्राच्या हितासाठी घेतला आहे. आमचे घाबरणारे सरकार नाही. आम्ही कोणालाही घाबरत नाही. आम्ही चांगले काम करत आहोत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. जिथे जिथे अडचणी येतात, तिथे मार्ग काढला जात आहे. आता मराठी भाषेसंदर्भातला ठोस निर्णय आमचे तिन्ही नेते बसून घेतील. आता या विषयावर नवीन समिती नेमलेली आहे. त्यामुळे याच्यातून नक्कीच मार्ग निघेल, कोणीही काळजी करू नका.

I accepted the trilingual formula, I lied, come kill me, Shinde group’s movement against Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या