Sanjay Raut : भारत – पाकिस्तान सामना फिक्सिंग, दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेल्याचा संजय राऊत यांचा दावा

Sanjay Raut : भारत – पाकिस्तान सामना फिक्सिंग, दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेल्याचा संजय राऊत यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारत – पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा फिक्सिंग मॅच असून यातून दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेला असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यातून 25000 कोटी रुपये पाकिस्तानत गेले आहेत. हा पैसा आता पाकिस्तान भारताविरुद्ध वापरणार आहे हे नरेंद्र मोदी, अमित शहा, जय शहा आणि भारतीय क्रिकेट बोर्डाला कळत नाही का? असा सवालही त्यांनी केला. Sanjay Raut 



संजय राऊत  Sanjay Raut म्हणाले, कालच्या मॅचवर दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेला. यातील काही पैसे पाकिस्तानला देखील मिळाले असतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1000 कोटी रुपये कालच्या मॅचने मिळाले. पाकिस्तान सोबत विजय किंवा पराजय हा मुद्दाच नाही. कोणी जर असे म्हणत असेल तर तो मूर्खपणा आहे. पाकिस्तान सोबत क्रिकेटची मॅच न खेळण्याचा मुद्दा आहे. पाकिस्तानला हरवल्यामुळे पहलगाम मधील 26 महिलांचे कुंकू परत आले का? पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची संधी असताना देखील भारताने माघार घेतली. बलुचिस्तान पर्यंत जाणार होते, त्यांचे कंबरडे मोडणार होते न

पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज मिळू नये, आयएमएफ, आशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज मिळू नये, म्हणून आपण प्रयत्न करत होतात. कारण हा पैसा पाकिस्तानला मिळाला असता तर तो पैसा पाक दहशतवादामध्ये गुंतवणूक करेल. ही भारताची भूमिका होती. ही मोदींची भूमिका होती. तर दुसरीकडे काल भारताने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला 1000 कोटी रुपये मिळवून दिले. हे पैसे कुठे जाणार आहेत? असा प्रश्नही त्यांनी विचारला. पाकिस्तानला आर्थिक दृष्ट लढण्यासाठी आणि भारतीय महिलांचे कुंकू पुसण्यासाठी सरकार मदत करत आहे. अशा मॅचवर आम्ही थुंकतो. 26 महिलांचे कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळतात? तुम्हाला लाजा वाटत नाही का? असा सवाल राऊत यांनी केला.

शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक असल्याने मनसेसाेबत युती शक्य होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर संजय राऊत म्हणाले, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास पवारांना काहीच अडचण नाही. महाराष्ट्राच्या भावना त्यांना ठाऊक आहेत, त्यामुळे पवार अडथळा ठरणार नाहीत, उलट त्यांनी अशा युतीला अनुकूलतेची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात काय चाललं आहे याची माहिती आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाला देत असतो. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही याची कल्पना असते. त्यामुळे शिवसेना-मनसे युतीवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी आडकाठी करणार नाही.

India-Pakistan match fixing, Sanjay Raut claims that Rs 1.5 lakh crore was gambled

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023