Andekar family : आंदेकर कुटुंबियांची तब्बल २० कोटींची मालमत्ता, फ्लॅट, गाळे, दुकाने , टपऱ्या आणि १६ विकसन करारनामे

Andekar family : आंदेकर कुटुंबियांची तब्बल २० कोटींची मालमत्ता, फ्लॅट, गाळे, दुकाने , टपऱ्या आणि १६ विकसन करारनामे

Andekar family

विशेष प्रतिनिधी

 

पुणे : Andekar family : आंदेकर टोळी उखडुन टाकण्यासाठी पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईमध्ये तब्बल २० कोटी४१ लाख २२ हजार रुपयांची मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे़. बंडु आंदेकर व त्याच्या कुटुंबाकडे १७ कोटी ९८ लाख ९३ हजार रुपयांची मालमत्ता असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यात जमिनी, फ्लॅट, दुकाने, १६ विकसन करारनामे आढळून आले आहे. त्याचे हितसंबधितांच्या नावे असलेल्या मालमत्तेची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

आंदेकर टोळीच्या निष्पन्न झालेल्या मालमत्तेबाबत मोका कायद्यातंर्गत कलम ४ प्रमाणे कारवाई करण्याची प्रक्रिया चालु आहे. बंडु आंदेकर याची फुरसुंगी येथील २४़५ गुंठे जागा, कोथरुड येथील फ्लॅट, दोन दुकान गाळे, ३ मजली घर, नाना पेठेतील एक फ्लॅट, लोहियानगर येथील २ खोल्या, साईनाथ झोपडपट्टी हडपसर येथे एक खोली आहे.



वृंदावनी वाडेकर हिचे ३ मजली राहते घर, एक टपरी, साईनाथ झोपडपट्टी, हडपसर येथे एक खोली आहे.
शिवम आंदेकर याच्या नावावर मुळशीतील अगळांबे गाव येथे २२ गुंठे जागा, कोथरुड व नाना पेठ येथील फ्लॅट व दुकान आहे.
शिवराज आंदेकर याच्या नावावर नाना पेठ येथे फ्लॅट आहे. सोनाली आंदेकर हिच्या नावारवर नाना पेठ येथे दोन दुकान गाळे़ अशी अंदाजे १७ कोटी ९८ लाख ९३ हजार रुपयांची मालमत्ता निष्पन्न झाली आहे.

माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुष गणेश कोमकर याचा ५ सप्टेंबर रोजी गोळीबार करुन खुन केला होता. या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आंदेकर टोळीची सर्व पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश दिले.

आयुष कोमकर खुन प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीप्रमुख बंडु आंदेकर याच्यासह एकूण १६ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. त्यामध्ये आंदेकर कुटुंबातील ३ महिलांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक केली आहे. आरोपी मुनाफ पठाण याने गुन्ह्यातील पिस्टल व काडतुसे कृष्णा आंदेकर यास पुरविल्याने तसेच सोनाली वनराज आंदेकर हिचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना देखील अटक करण्यात आली आहे.

बंडु आंदेकर व त्याची मुलगी वृंदावणी वाडेकर यांचे घरातील सीसीटीव्ही फुटेज डिलिट करणारा त्याच्या टोळीचा सदस्य मोहन चंद्रकांत गाडेकर याला २६ सप्टेंबर रोजी अटक केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत २ पिस्टल, ४ चारचाकी गाड्या, ४ दुचाकी, आरोपी वापरत असलेले व घरात मिळून आलेले एकूण २८ मोबाईल, सोन्याचे व चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण ९५ लाख २९ हजार ४०० रुपयांचा माल जप्त केला आहे. आंदेकर टोळीतील सदस्य व नातेवाईक यांची ३७ बँक खात्यातील १ कोटी ४७ लाख रुपयांची मालमत्ता सील करण्यात आली आहे.

आयुष कोमकर खुन प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडे आंदेकर टोळीविरुद्ध खंडणी मागितल्याचे प्रकरणात फरासखाना पोलीस ठाण्यात व सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आंदेकर टोळीविरुद्ध नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होताच कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके व गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार करत आहेत.

बंडु आंदेकर व त्याच्या कुटुंबियाची निष्पन्न झालेली १७ कोटी ९८ लाख ९३ हजार रुपयांची मालमत्ता, जप्त केलेले ९५ लाख २९ हजार ४०० रुपये आणि बँकेतील सील केलेली १ कोटी ४७ लाख रुपयांची मालमत्ता अशी एकूण २० कोटी ४१ लाख २२ हजार ४०० रुपयांची मालमत्ता आंदेकर टोळीकडे असल्याचे आतापर्यंत निष्पन्न झाले आहे.

Andekar family has assets worth Rs 20 crores, flats, houses, shops, stalls and 16 development agreements

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023