विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी ३० जूननंतर होणार आहे. कारण यंदाच्या वर्षी सरकारवर मोठा आर्थिक भार पडला आहे. परंतु, जाहीरनाम्यात शब्द दिल्याने सरकारने तो निर्णय घेतला असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, हे असं सारखं सारखं होणार नाही, असेही ते म्हणाले.Ajit Pawar
शेतकऱ्यांच्या ‘महाएल्गार’ मोर्चानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यासाठी ३० जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यावरून वेगवेगळ्या स्तरातून सरकारवर टीका होऊ लागल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी ३० जूननंतरच का? याबाबत स्पष्टीकरण दिले.Ajit Pawar
बारामतीच्या भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी कर्जमाफी योग्य वेळी दिली जाईल असे सरकार म्हणत होते, ती योग्य वेळ २०२८ आण ि २०२९ मध्ये असू शकली असती ती २०२६ मध्येच सर्व शेतकरी नेत्यांनी एकत्र येत आणली. हे आमच्या आंदोलनाच े सर्वात मोठे यश आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा येईपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
नुकसान झाले आहे. शेतमालाला भाव नसल्यान े शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळ े शेतकऱ्यांना सावरण्यासाठी ३२ हजार कोटी रुपयांची मदत केली असून ती शेतकऱ्यांचा खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती भरणे यांनी दिली.
बँका शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करतात. शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त लावली पाहिजे. यात आम्हाला राजकारण करायचे नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून ३० जूनला कर्जमाफी होईल. अतिवृष्टी, दुष्काळ, पूरस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे शेतमाल व फळबागांचे नुकसान झाले आहे.
Due to financial burden, loan waiver will be implemented after June 30, says Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















