विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आल्या नाहीत. मात्र माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी निवडणुकीच्या तारखांची सविस्तर माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांना निवडणुकीच्या तारखांची माहिती कोणी दिली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. Dilip Walse Patil
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव-शिरूर तर्फे आयोजित मेळाव्यात बोलताना म्हणाले, “माझी जी माहिती आहे त्या माहिती प्रमाणे साधारणपणाने 15 डिसेंबरला जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान होईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील. 15 जानेवारीला महापालिका निवडणुकीचे मतदान होईल आणि 31 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील. Dilip Walse Patil
5 नोव्हेंबरला राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील, असा अंदाज दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केला. 5 नोव्हेंबरला बुधवार आहे म्हणजे त्याच दिवसापासून आचारसंहिता देखील लागू होईल. प्रथम नगर परिषदेच्या निवडणुका पार पाडतील. या निवडणुका सुरू असतानाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होईल.
आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे. इच्छुकांनी तयारीला सुरुवात केली असून भेटीगाठी, दौरे सुरू झाले आहेत. महायुती किंवा महाविकास आघाडी होणार की नाही याची वाट न पाहाता इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अनेक इच्छुक उमेदवार तयारी करत आहेत. न्यायालयानं 31 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अजून निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. तरीही इतकी सविस्तर माहिती दिलीप वळसे पाटील यांनी कशी दिली असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Who Informed Dilip Walse Patil About Election Dates
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















