विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ( एटीएस) पुण्यामधून पकडलेल्या सॉफ्टवेअर इंजिनीअर झुबैर हंगरगीकर प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून पुण्यातील कोंढवा आणि ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या दोन ठिकाणी शोधमोहीम राबवली. या कारवाईदरम्यान दोन संशयित व्यक्तींच्या घरांची तपासणी करण्यात आली, मात्र कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.
एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही केवळ शोधमोहीम होती, तपासाच्या प्रक्रियेचा नियमित भाग म्हणून ती करण्यात आली. दोन्ही ठिकाणांवरील व्यक्तींची ओळख सुरक्षेच्या कारणास्तव उघड करण्यात येत नाही.
झुबैर हंगरगीकर सध्या महाराष्ट्र एटीएसच्या कोठडीत असून, न्यायालयाने त्याला १४ नोव्हेंबरपर्यंत एटीएस कोठडी दिली आहे. झुबैरच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी तपासाची गरज भासल्याने कोंढवा आणि मुंब्रा येथे शोध घेण्यात आला.
एटीएस सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, झुबैर हंगरगीकर याचा दिल्लीतील स्फोट प्रकरणाशी कुठलाही संबंध अद्याप आढळून आलेला नाही. सध्या जम्मू-काश्मीरमधील प्रकरणाशी महाराष्ट्रातील संभाव्य दुवे पडताळले जात आहेत.
अधिकाऱ्यांच्या मते, अशा शोधमोहीमा या दहशतवादी नेटवर्कच्या संभाव्य संपर्कांचा मागोवा घेण्यासाठीच्या नियमित प्रक्रियेचा भाग आहेत. एटीएसने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, नागरिकांना कोणतीही अफवा किंवा चुकीची माहिती न पसरविण्याचे आवाहन केले आहे.
ATS Maharashtra conducts ‘search operation’ in Kondhwa and Mumbra, investigation related to Zubair Hangargikar case begins
महत्वाच्या बातम्या
- हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप
- Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा
- राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
- स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले



















