विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुळजापूर शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींना थेट भाजपात प्रवेश दिल्याने विरोधी पक्षाकडून जोरदार टीका सुरू आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपने नवीन मशीन आणल्याची टीका केली आहे. Tuljapur Drug Racket
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ड्रग्ज विकणारा असेल, बुकी असेल अशा लोकांसाठी भाजपाने नवीन मशीन आणलं आहे. त्या मशीनमध्ये ते या लोकांना घालत आहेत. ड्रग्ज तस्करी करणारा असेल, माफिया असेल, सर्वात मोठा गुंड असेल, अशा लोकांसाठी भाजपाने तीन प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत. ते या लोकांना मशीनमध्ये घालतात आणि शुद्ध करून घेतात. भाजपाला जर जनाची आणि मनाची नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांच्या भाजपा प्रवेशावर संताप व्यक्त केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ड्रग्ज विकणारा असेल, बुकी असेल अशा लोकांसाठी भाजपाने नवीन मशीन आणलं आहे. त्या मशीनमध्ये ते या लोकांना घालत आहेत. ड्रग्ज तस्करी करणारा असेल, माफिया असेल, सर्वात मोठा गुंड असेल, अशा लोकांसाठी भाजपाने तीन प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत. ते या लोकांना मशीनमध्ये घालतात आणि शुद्ध करून घेतात. भाजपाला जर जनाची आणि मनाची नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांच्या भाजपा प्रवेशावर संताप व्यक्त केला आहे.
सुप्रिया सुळे यांनीही याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, तुळजापूर शहरातील काहीजणांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींंचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली.
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते,याबाबत आपणही सहमत असाल.
आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते.
तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल की अपेक्षा आहे.
Opposition Slams BJP for Inducting Men Linked to Tuljapur Drug Racket
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















