विशेष प्रतिनिधी
अलीबाग : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गाेगावले यांच्यात विळ्या- भाेपळ्याचे सख्य आहे. महायुतीत असूनही दाेघांच्या एकमेंकांवर कुरघाेड्या चालू असतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी शिवसेना शिंदे गटाला धक्का दिला असून भाजपसाेबत युती करून जागावाटपही जाहीर केले आहे.
रायगड जिल्हा पालकमंत्रिपदावरून चांगलाच चर्चेत आला होता. पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना देण्यात आल्यानं भरत गोगावले चांगलेच नाराज झाले होते. आता रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाला भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं मोठा धक्का दिला आहे.
रायगड जिल्ह्यातील पहिली भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युती महाड नगर परिषद निवडणुकीसाठी जाहीर झाली असून, महायुतीत फूट पडल्याचे संकेत मिळत आहेत. संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. नगराध्यक्ष पदासह 16 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, तर 5 जागांवर भारतीय जनता पक्ष उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून, महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप विरुद्ध शिवसेना अशी त्रीकोनी लढत रंगणार आहे.
या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप, भाजप जिल्हा सरचिटणीस बिपिन म्हमुनकर यांची देखील उपस्थिती होती. हा रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Tatkare’s Bharat Gegawale gets a shock in Raigad, alliance with BJP and seat sharing announced
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















