विशेष प्रतिनिधी
पाटणा : Bihar Election 2025 बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जलवा चालल्याचे दिसत असून गेल्या वेळीपेक्षा संयुक्त जनता दलाने (जेडीयू) माेठी कामगिरी केली आहे. भारतीय जनता पक्ष व लाेकजनशक्ती पक्षासाेबत लढत असलेला जनता दल (यु) सर्वात माेठा पक्ष म्हणून पुढे येऊ लागला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार का प्रश्नच मिटला आहे. Bihar Election 2025
2020 च्या निवडणुकांत जनता दलाने अत्यंत खराब कामगिरी केली हाेती. त्यांना केवळ 43 जागा मिळाल्या हाेत्या. मात्र, यंदा नितीशकुमार यांच्या जनता दलाने गेल्यावेळीपेक्षा दुप्पट जागा मिळविण्याच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. भारतीय जनता पक्ष 79 जागांवर तर चिराग पास्वान यांचा लाेकजनशक्ती पक्ष 22 जागांवर आघाडीवर आहे. Bihar Election 2025
महागठबंधन दारुण पराभवाच्या छायेत आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाला गेल्या वेळीच्या तुलनेत अर्ध्या जागाही टिकविता येतील की नाही अशी शंका आहे. राष्ट्रीय जनता दल 38 तर काॅंग्रेस सात जागांवर आघाडीवर आहे. रणनितीकार प्रशांत किशाेर यांच्या जनसुराज पक्षाला एकाही जागेवर आघाडी आता तरी दिसत नाही.
Nitish Kumar’s victory in Bihar, JDU is the largest party, Grand Alliance is heading towards a crushing defeat
महत्वाच्या बातम्या
- हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप
- Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा
- राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
- स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले



















