विशेष प्रतिनिधी
पुणे : अंजली दमानिया यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की, मध्येच एखादं प्रकरण सोडत जाऊ नका. एखाद्या प्रकरणावर बोलल्यानंतर ते शेवटापर्यंत घेऊन जा. पण मध्येच त्यांना काय होतं ते कळत नाही. अचानक वाचा बातमी उद्याच्या अंकात आणि दमानियांचा उद्याचा अंकच निघत नाही, पण असं होऊ नये अशी अपेक्षा असल्याचे असल्याचा टोला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना लगावला आहे. Sushma Andhare
पुण्याच्या कोरेगाव पार्कच्या जवळील मुंढवा येथील 40 एकर जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव समोर आल्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर आता अंजली दमानिया यांनी आणखी एक 500 कोटींचं रुग्णालय हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना? असा दावा केला आहे. याप्रकरणी विरोधक टीका करताना असतानाच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच विरोधकांच्या टीकेनंतर पालघर साधू हत्याकांडातील आरोपी काशिनाथ चौधरींचा पक्षप्रवेश स्थगित करण्यात आला आहे. याप्रकरणी देखील सुषमा अंधारे यांनी भाजपावर टीका केली.
काशिनाथ चौधरींच्या भाजपा प्रवेशावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपा हा कमालीचा दांभिक पक्ष आहे. धर्म नावाची गोष्ट भाजपासाठी श्रद्धेचा आणि आस्तेचा विषय नाही. भाजपासाठी फक्त एक मार्केटिंग फंडा आहे. त्यामुळेच पालघर हत्याकांड प्रकरणात ज्या काशिनाथ चौधरी नावाच्या व्यक्तीवर ठपका ठेवण्यात आला. त्याच्या विरोधात भाजपाने रान पेटवलं होतं. आता त्याच माणसाला भाजपाने पक्ष प्रवेश दिला आहे. अशाच प्रकारे भाजपाने बडगुजर यांनाही पक्ष प्रवेश दिला होता.
भाजपाने अशाचप्रकारे भुजबळांना देखील मंत्रिपद दिलं. अशाच पद्धतीने मांडीला मांडी लाऊन नवाब मलिकांच्या शेजारी भाजपावाले बसले. जर टीका झाली नसती तर भाजपाने पालघर साधू हत्या प्रकरणातील आरोपीचा देखील प्रवेश करून घेतलाच असता. कारण देवेंद्र फडणवीस यांची अशी अडचण आहे की, ते स्वत: नेते घडवू शकत नाहीत. तसेच पक्षात असणाऱ्या दुसऱ्या नेत्यांचं नेतृत्व ते मान्य करत नाहीत. त्यामुळे त्यांना बाहेरचे लोक आयात करावे लागतात.
सुषमा अंधारे यांनी दावा करताना म्हटले की, भाजपा आता त्यांच्याबरोबरील एक-एक कुबड्या काढून टाकत आहेत. त्यासाठी दमानिया यांच्यासारखे लोकही त्यांना मदत करतात. परंतु अंजली दमानिया अशा कोणी नाहीत की, त्यांच्यावर सर्व राजकारण अवलंबून राहील. खरं तर दमानिया सरकारला सहाय्यभूत ठरणारी एक यंत्रणा आहेत. अशी यंत्रणा अण्णा हजारे यांच्याही काळात होती आणि ती यंत्रणा आताही आहे. परंतु मुद्दा हा आहे की, अजित पवार यांच्या मुलाचा एका जमीन प्रकरणाशी संबंध येतो. तसेच मुरलीधर मोहोळांचाही प्रत्यक्ष संबंध एका जमीन व्यवहारात येतो. मग अजित पवार यांचा राजीनामा तुम्ही मागता? मग मुरलीधर मोहोळांबाबत मौन का? त्यांचाही राजीनामा मागायला पाहिजे ना? कारण दोन्ही प्रकरणे जमीनीशी संबंधित आहेत, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी अंजली दमानियांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले.
Read the news in tomorrow’s issue and Damania, tomorrow’s issue is not coming out, Sushma Andhare’s criticism
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…



















