विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : Sanjay Gaikwad सत्ता असताना तुम्ही मुंबईतील डान्सबारमधील महिलांशी अश्लील चाळे करत बसला, तुम्हाला संध्याकाळी नशा केल्याशिवाय जमत नाही असा हल्लाबोल शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष विजय शिंदे यांच्यावर केला.Sanjay Gaikwad
बुलढाणा नगर परिषदेच्या निवडणुकीत बुलढाण्यात भाजपाचे जिल्हा अध्यक्ष विजय शिंदे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात चांगलीच जुंपली आहे. बुलढाणा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांच्या पत्नी आणि शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी या आमने-सामने आहेत.Sanjay Gaikwad
भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी संजय गायकवाड यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं की, “बुलढाण्यातील जनता ही सुज्ञ आहे. बुलढाण्यातील जनतेला भयमुक्त, दहशतमुक्त आणि घराणेशाही मुक्त वातावरण हवं आहे. हे शहर शांत आणि संयमी लोकांचं आहे. या शहरामध्ये एखाद्या परिवारामध्ये सत्तेची किती भूक असावी? मुलगा, पत्नी, व्याही, पुतण्य़ा , भाचा हे नगरपालिकेत आणि जावई जिल्हा परिषदेवर अशी एकाच घरात किती सत्ता असावी? एकाच घरात एवढी सत्ता आल्यावर ते अराजकतेकडे जातात. त्यामुळे भयमुक्त, नशामुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त शहर हा आमचा नारा आहे.”Sanjay Gaikwad
विजय शिंदे यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देताना आमदार गायकवाड म्हणाले की, मी माझ्या परिवारातील तीन तिकिटं कापली आहेत. तुम्हाला तुमचं घर सांभाळता आलं नाही, कार्यकर्त्याला मोठं करता आलं नाही. तुला संध्याकाळी नशा केल्याशिवाय जमत नाही आणि तू काय नशामुक्त बुलढाणा करणार? पंधरा वर्षे सत्ता असताना यांनी जनतेची सेवा न करता मुंबईतील डान्सबारमधील महिलांशी अश्लील चाळे केले. जनतेची सेवा न करता अय्याशी केली असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला. आमची सत्ता कशी असते हे लोकांनी पाहिलंय. कोरोना काळात आम्ही काम केलं. आमचा एक तरी भ्रष्टाचार दाखवा. गायकवाड कुटुंबाने जनसेवेचं व्रत घेतलं आहे, मरेपर्यंत आम्ही जनतेची सेवा करणार
“Sanjay Gaikwad Explodes: BJP Leader ‘Indulged in Obscene Acts with Dance Bar Women While in Power
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















