Shahajibapu Patil : पैशावर तालुका विकत घेण्याचा नाद करू नका, कुत्री मांजरं म्हणत शहाजीबापू पाटलांचा भाजप नेत्यांना इशारा

विशेष प्रतिनिधी

सांगोला : Shahajibapu Patil  पैशावर तालुका विकत घेण्याचा नाद करू नका. ही लढणारी औलाद आहे.महाराष्ट्र मला घाबरतो, अन् आता ही कुत्री मांजरं मला घाबरवायला लागले आहेतShahajibapu Patil

शहाजी बापू पाटील यांनी सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. दीपक साळुंखे आणि भाजप नेते व पालक मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना शहाजी बापू म्हणाले की- स्वाभिमानाची निवडणूक आहे. आपल्याला गुलाम बनविले, त्यापेक्षा जास्त मोठी गुलामगिरी आली आहे. गणपतराव देशमुख 75 वर्षे आणि मी 51 वर्षे इथे आहे, स्वाभिमानी जनता होती. आता हेलिकॉप्टर घेऊन येत धाड धाड गुंडशाही सुरू केली. निवडणुकीपूर्वी मला माहीत होते भाजपने कंबरडे मोडले. मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली. भाजपसोबत इतका प्रामाणिक वागून माझ्यासोबत का असे वागले?Shahajibapu Patil



या तालुक्यात दोनच राजे आहेत. एक म्हणजे गणपतराव देशमुख आणि दुसरा तो म्हणजे शहाजी बापू. आता गणपतराव देशमुख यांच्या समाधीला पूजनाचा अधिकारी यांचा नाही.

शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही शब्द मी मोडला नाही. लोकसभेला मी आजारी असतानाही भाजप उमेदवाराला पंधरा हजाराचं मताधिक्य दिलं. मी माझ्या आजारपणाचा कोणताही विचार न करता काम करत राहिलो, याचं फळ मला दिलयं का?

“Don’t Try to Buy an Entire Taluka With Money,” Shahajibapu Patil Warns BJP Leaders, Calling Them ‘Dogs and Cats’

महत्वाच्या बातम्या