विशेष प्रतिनिधी
बीड : Sharad Pawar group भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणणाऱ्या राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यावर नगर- साेलापूर महामार्गावर प्राणघातक हल्ला झाला. दहा ते पंधरा जणांच्या टाेळक्याने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात बुधवारी रात्री शरद पवार गटाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे गंभीर जखमी झाले आहेत. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.Sharad Pawar group
रात्री उशिराच्या सुमारास मांदगावजवळ नगर-सोलापूर महामार्गावर दहा ते पंधरा जणांच्या मुखवटा घातलेल्या टोळक्याने राम खाडे गाडी अडवून जोरदार हल्ला केला. दगडफेक, गाडीची तोडफोड आणि त्यानंतर धारदार शस्त्रांनी जिवे मारण्याचा प्रयत्न करत गंभीर जखमी केले. त्यांच्यासोबत असलेले सहकारीही मारहाणीमुळे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर या घटनेत राजकीय कटकारस्थान असल्याची शंका अधिक तीव्र झाली आहे.Sharad Pawar group
खाडे आपल्या सहकाऱ्यांसह मांदळी गावातील एका हॉटेलमधून जेवण करून बीडकडे परतत होते. अचानक अंधारात हल्लेखोरांनी गाडीच्या समोर अडथळा आणला आणि जोरदार दगडफेक सुरू केली. साईड मिरर फोडत वाहनाची मोठी हानी केली. त्यानंतर लाठ्या, तलवारी, पिस्तूल आणि सत्तूर घेऊन हल्लेखोरांनी थेट गाडीत घुसण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खाडे यांनी काही वार हातावर झेलले, परंतु हल्ला अत्यंत आक्रमक असल्याने त्यांच्या हाताला खोल जखमा झाल्या. परुग्णालयात दाखल होईपर्यंत त्यांची शुद्ध गेली होती आणि शरीर रक्तबंबाळ झाले होते.
हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ अहिल्यानगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक होत गेल्याने तातडीने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले. रुग्णालय प्रशासनानेही त्यांच्या प्रकृतीवर गंभीर असल्याचे म्हटले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळावरून एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर खाली पडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे प्राप्त झाले आहेत.
खाडे यांच्या जखमी सहकारी दीपक खिळे यांनी या हल्ल्यामागे थेट राजकीय द्वेष असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, राम खाडे अनेक भ्रष्टाचार प्रकरणे उघडकीस आणण्यात आघाडीवर होते. त्यांनी विविध स्तरांवर तक्रारी केल्याने काही व्यक्तींना मोठा फटका बसणार होता. त्यामुळेच बदला घेण्यासाठी नियोजनपूर्वक हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात आवाज उठवल्याची शिक्षा आम्हाला देण्यात आली, असेही त्यांनी म्हटले आहे. हल्लेखोरांबरोबरच हल्ल्याचे सूत्रधार कोण आहेत? याचा तपास करुन तातडीने अटक व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी फेसबुक पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, बीडचे नामांकित सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ खाडे यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यातील मंदाली गावातील एका हॉटेलजवळ अनोळखी व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला आहे. रामभाऊ खाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे पर्दाफाश करत आहेत. त्यामुळे घोटाळे उघड करणाऱ्या व्यक्तीवर हा हल्ला ठरवूनच करण्यात आला असावा, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी न्यायालयाने त्यांना पोलिस सुरक्षा दिली होती, मात्र गृह विभागाने कोणाच्या सांगण्यावरून त्यांची सुरक्षा अचानक काढून घेतली, हे अत्यंत धक्कादायक आहे. तसंच, खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या बंदुकीचे रिन्यूअलही मुद्दामहून थांबवण्यात आले,असा आराेप मेहबूब शेख यांनी केला.
Sharad Pawar group leader attacked in Beed, stabbed by masked gang
महत्वाच्या बातम्या
- भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
- Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
- ‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका
- Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर



















