Chhagan Bhujbal : … तकलीफ लोगों को तब हुई, जब मैं फिर भी जी गया, छगन भुजबळ यांचा शेराेशायरीतून विराेधकांचा समाचार

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Chhagan Bhujbal  संघर्ष की रात जितनी अंधेरी होती है, सफलता का सुरज उतना ही तेज चमकता है| सवाल जहर का नहीं था, वो तो मै पी गया, तकलीफ लोगों को तब हुई, जब मैं फिर भी जी गया, अशी शेरोशायरी करत अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी विराेधकांचा समाचार घेतला. मला जे प्रेम दिले ते महायुतीच्या उमेदवारांना प्रेम द्या, असे सांगत निवडून देण्याचे आवाहन केले.



नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी थेट रुग्णालयातून प्रचारसभेत सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप असलेल्या अवस्थेत छगन भुजबळ यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले. सोशल मीडियावर छगन भुजबळ यांच्या प्रचाराचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर आहेत. छगन भुजबळ यांनी रुग्णालयातून येवलावासियांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.

भुजबळ म्हणाले, विकासाच्या मुद्द्यावर इथे आलो आणि विकासकामे केलीमाझी इच्छा असताना नगरपरिषद निवडणुकांमध्ये सहभाग घेता आला नाही. विकासाच्या मुद्द्यावर इथे आलो आणि विकासकामे केली. २००४ मध्ये मला काम करण्याची, सेवा करण्याची संधी येवल्यात मिळाली. हजारो कोटी रुपयांची कामे करायला मिळाली. त्यासाठी आपली साथ होती. अनेक कामे मतदारसंघात केली, म्हणून तुम्ही मला ५ वेळा निवडून दिले. आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सर्वच उमेदवारांना आपण निवडून द्याल. आगामी काळात विकासकामे करणार आहोत त्याचा वचननामा आपल्याकडे पोहोचला आहे. येवल्यात नसलो तरी समीर, पंकज येवल्यात रात्रंदिवस काम करत आहेत.

Chhagan Bhujbal fires poetic shot at opponents, says they were hurt by my survival

महत्वाच्या बातम्या