विशेष प्रतिनिधी
पुणे : Voter Registration पुढील वर्षी होणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी झालेल्या मतदार नोंदणीला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याचे प्राथमिक मतदारयादीतून स्पष्ट झाले आहे. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण २ लाख ७२ हजार ६१ पदवीधर आणि ४४ हजार २३३ शिक्षक मतदारांनी नोंदणी केली आहे. मात्र ही संख्या २०२० मधील नोंदणीपेक्षा लक्षणीय कमी आहे.Voter Registration
पदवीधर मतदारसंघासाठी पुणे जिल्ह्यात ५४ हजार ८१०, सातारा जिल्ह्यात ३५ हजार ७८९, सोलापूरमध्ये ३० हजार ४७२, कोल्हापूरमध्ये ८० हजार १८० आणि सांगली जिल्ह्यात ७० हजार ७२० अशी नोंदणी झाली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी पुण्यात ९ हजार ७७८, सातारा ८ हजार ४९२, सोलापूर ११ हजार १९८, कोल्हापूर ८ हजार ६१ आणि सांगलीत ६ हजार १३४ अशी नोंद झाली आहे.Voter Registration
२०२०च्या निवडणुकीत पदवीधर मतदारांची संख्या तब्बल ४ लाख २० हजार ८९६ इतकी होती, तर शिक्षक मतदारांची संख्या ७२ हजार १९० होती. यंदाच्या तुलनेत हा फरक मोठा असल्याने निवडणूक व्यवस्थेचीही चिंता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त व मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राजकीय पक्षांना आणि सामाजिक संस्थांना आवाहन केले आहे की, पात्र मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे. “या विशेष प्रकारच्या मतदारसंघात योग्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे,” असे ते म्हणाले.
प्राथमिक यादी जाहीर झाल्यानंतर आता आक्षेप आणि दुरुस्त्यांची प्रक्रिया सुरू होणार असून, अंतिम यादी आगामी निवडणूक कार्यक्रमापूर्वी जाहीर केली जाईल.
Low Response to Voter Registration for Graduate and Teacher Constituencies
महत्वाच्या बातम्या
- भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
- Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
- ‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका
- Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर